श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ दिमाखात
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगाम शुभारंभ दिनांक १६.१०.२००२ रोजी सकाळी • ११.०० वाजता या शुभमुहूर्तावर मा. विरोधी पक्ष नेते आमदार श्री प्रविणजी दरेकर, आमदार श्री शहाजीबापू पाटील, श्री शेखर गायकवाड साखर आयुक्त, पुणे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच कलश पूजन कारखान्याचे संचालक श्री दत्तात्रय विश्वनाथ नरसाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी बोलताना साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड म्हणाले की, आपल्या संपूर्ण भारत देशातून ११२ लाख मे. टन साखर निर्यात केली असून, यापैकी महाराष्ट्र राज्यातून ७० लाख मे. टन साखर परदेशामध्ये निर्यात केलेली आहे. यावर्षीही विक्रमी साखरेचे उत्पादन होणार आहे. तसेच ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी कारखान्याच्या अडचणीच्या काळात काही रक्कम ठेवी स्वरूपात ठेवल्यास कारखाना आर्थिक अडचणीतून मार्ग काढून सुस्थितीत येईल, असा प्रयोग महाराष्ट्रातील बऱ्याच सहकारी साखर कारखान्यांनी केल्यामुळे सदरचे सहकारी कारखाने बँकांकडे कर्जासाठी न गेल्यामुळे कारखान्यांचा कर्जाचा डोंगर कमी झाल्याचे सांगितले. यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये साखर कारखान्यातील ऊस तोडणीसाठी ४० टक्के सबसिडीने हार्वेस्टर मशिन खरेदी करणेसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांचे हे १५ एप्रिल पर्यंत पूर्ण होईल असे आमचे कार्यालयाकडून नियोजन करण्यात आलेले आहे. जे कारखाने वेळेत ऊस नेतील व ऊस बिल थकविणार नाहीत, अशा कारखान्यांनाच ऊस देण्याचे आवाहन शेतकन्यांना केले. आपल्या कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी होणेसाठी शुभेच्छा देऊन, आता पंढरपूर तालुक्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशा अपेक्षा व्यक्त केली .
स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे संचालक श्री तुकाराम मस्के सर यांनी केले, तर कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, समाधान काळे, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले, तसेच एम.एस.सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे एम. डी. श्री अमर पाटील, मुंबई बँकेचे संचालक श्री विठ्ठलराव भोसले, साखर उपआयुक्त श्री संजयकुमार भोसले तसेच दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन व सिताराम कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजीराव काळुंगे सर व राजाराम सावंत, कारखान्याचे माजी संचालक, पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक उपस्थिती होते.