मोहोळ येथील उद्योजक व सुमनकीर्ती हिरो शोरूमचे मालक श्री. विजयकुमार कादे यांच्या हस्ते 80 हजार रुपये किमतीचा प्रतिकात्मक चेक प्रदान
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
सुमनकिर्ती हिरो शोरूम पंढरपूरचे ग्राहक श्री. विकास गावंधरे हे हिरो कंपनीच्या प्री बुकिंग ऑफरचे लकी विजेते ठरले असून त्यांना ८० हजार रुपयाचा प्रतिकात्मक चेक सुमनकिर्ती शोरूम चे मालक विजयकुमार कादे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
सुमनकिर्ती हिरो पंढरपूर येथे नवरात्र महोत्सवात दसऱ्यानिमित्त हिरोच्या दुचाकी गाडीसाठी प्री बुकिंग ऑफर सूरू होती. मागील आठवड्यात हिरो कंपनीकडून संबंधित ऑफरच्या लकी विजेत्यांची ची नावे निश्चित करण्यात आली. महाराष्ट्रातून सहा ग्राहकांची निवड करण्यात आली. यामध्ये मौजे भोसे तालुका पंढरपूर येथील सुमनकीर्ती हिरो शोरूमचे ग्राहक श्री. विकास गावंधरे हे हिरो कंपनीच्या प्री बुकिंग ऑफरचे लकी विजेते ठरले होते. या ऑफरमध्ये श्री. विकास गावंधरे यांनी स्प्लेंडर प्लस हि दुचाकी बुक केली होती.
आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लकी विजेते श्री विकास गावंधरे यांना वाळूज तालुका मोहोळ येथील उद्योजक व सुमनकीर्ती हिरो शोरूमचे मालक श्री. विजयकुमार कादे यांच्या हस्ते 80 हजार रुपये किमतीचा प्रतिकात्मक चेक प्रदान करण्यात आला. यावेळी सुमनकिर्ती हिरो शोरूममध्ये विजेते ग्राहक विकास गावंधरे यांचे हस्ते केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. ग्राहकांसाठी अल्पोपहार देखील ठेवण्यात आला होता.
दरम्यान हीच ऑफर हिरो कंपनीने पुन्हा एकदा दीवाळीनिमित्त पाडव्यापर्यंत लागू केली आहे. या प्री बुकिंग ऑफरचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सुमनकीर्ती हिरो शोरूम चे मालक विजयकुमार कादे यांनी केले आहे.
यावेळी, संजय ताड, विश्वास डोंगरे, नंदकुमार उपाशे, माऊली होऊनकळस, निखील जोशी, मॅनेजर महेश कवडे, आनंद नागणे, दत्ता चव्हाण, फायनान्स कंपनीचा सर्व स्टाफ यांचेसह ग्राहक व सुमनकीर्ती हिरो चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.