कारखानदारा विरोधात शेतकरी संघटनांनी आवळली वज्रमूठ
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
ऊस दर कमी, काटा मारी व रिकव्हरी कमी दाखवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर सम्राटांकडून वर्षानुवर्षे होणारी पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही.शेतकरी जागरुक झाला असून घामाचे दाम मिळविण्यासाठी शेतकरी सक्षम आहे. यंदाच्या ऊस हंगामात उसाला प्रति टनास ३ हजार १०० रुपये दराची मागणी ऊस परिषदेत करण्यात आली असून एकरकमी २ हजार ५०० उचल घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा सूर ऊस परिषदेत निर्धार करण्यात आला .
पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक , शिवतीर्थ याठिकाणी ऊसदर संघर्ष समितीच्या व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावतीने ऊस परिषद पार पडली. ऊस परिषदेला विक्रमी गर्दी दिसून आली. दिवाळी सणासुदीच्या दिवशी सुद्धा शेतकरी वर्गांची ऊस परिषदेला उपस्थिती होती.
सर्व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ऊस दर संघर्ष समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या वतीने ही भव्य ऊस परिषद संपन्न झाली.
यावेळी साखर कारखान्यांवरील ऊस वजन काटे ऑनलाइन करण्यात यावेत. कोणत्याही खासगी काट्यावर उसाचे वजन करण्याची परवानगी देण्यात यावी यावेळी ऊस परिषदेत ठराव संमत करण्यात आला असून साखर विक्रीचा किमान हमीभाव एसएमपी ३१०० वरून ते ३५०० करण्यात यावा. देशात आवश्यक आहे तेवढेच साखर उत्पादन करून बाकीचे इथेनॉल निर्मिती करावी
कोरोना व अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करण्यात
गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळाच्यामार्फत सर्व ट्रॅक्टर मालकांना ऊस तोडणी कामगार पुरविण्यात यावेत. ऊस तोडणी एफआरपीमधून देण्याऐवजी केंद्रीय रोजगार हमी योजनेतून देण्यात यावी अशा इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्हा ऊस संघर्ष समितीच्या वतीने जिल्ह्यातील साखर कारखानदारांना ऊस दराच्या निर्णयासाठी दोन दिवसाची मुदत देण्यात येऊन निश्चित केल्याप्रमाणे दर मिळविण्यासाठी रस्त्यावरील आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला अशी विविध मागणी केली आहे.
यावेळी तानाजीराव बागल, दीपक भोसले, सचिन पाटील, समाधान फाटे, संजय कोकाटे,
शिवाजीभाऊ पाटील, विजय रणदिवे, विश्रांती मुसनर, रणजित बागल, अजित बोरकर, किरण घाडगे, माऊली हळणवर, माऊली जवळेकर, सचिन आटकळे, नामदेव कोरके, राहुल घुले, आदिनाथ परबत, निवास नागणे, सोमनाथ घोगरे, आदी विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, पक्षाचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आजच्या ऊस परिषदेतील ठराव
- @ राज्यातील सर्व कारखान्याचे वजन काटे online करावे सर्व शेतकर्यांनी कुठेही खाजगी कट्यावरून ऊसाचे वजन करून आणण्याची मुभा देण्यात यावी.
-@ साखर विक्री चा किमान हमीभाव SMP 3100 वरून 3500 करण्यात यावा.
- @ देशात आवश्यक आहे तेवढीच साखर उत्पादन करुण बाकीचे इथेनॉल निर्मिती करावी त्यामुळे परकीय चलन वाचेल आणि शेतकऱ्यांनाही उसाला 5000 पर्यंत दर मिळेल
- @ कोरोना व अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा
-@ तुकाराम मुंढे सारखा खमक्या अधिकारि साखर आयुक्त म्हनून नेमावा
-@ शेतीपंपाचे लाईट बिल पूर्ण माफ करून शेतकऱ्यांना उच्च दाबाने 12तास वीज पुरवठा मिळाला पाहिजे
- @ गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळाच्या मार्फत सर्व ट्रॅक्टर मालकांना ऊस तोडणी कामगार पुरवण्यात यावे..
- @ ज्या ट्रॅक्टर मालकांनची ऊस तोडणी मजूर पळून जातील त्यांचे कराराचे अडव्हांस माफ करण्यात याव्या.
- @ ऊस तोडणीची मजुरी FRP मधून देण्या ऐवजी केंद्रीय रोजगार हमी योजनेतून देण्यात यावी.
-@ साखर कारखाने व डीस्लारी तील हवाई अंतराची अट रद्द करण्यात यावी.
- @ जे कारखाने आर्थिक अडचणीत आल्यामुळे लिलाव करुन कवडीमोल दराने विक्री करण्याऐवजी त्यावर शासनाचा प्रशासक नेमुन सरकारी नियंत्रनाखाली चालवावे...
- @ राज्यातील सर्व साखर कारखान्यांना NCDC व नाबार्डचे 4% व्याज दराने कर्ज पुरवठा करण्यात यावे...
- @ सर्व गुराळग्रहे व ज्वाग्री गुळपावडर कारखान्यांना FRP चा कायदा लागू करुण त्यांना ही इथेनॉल उत्पादन करण्याची परवानगी देण्यात यावी.
-@ बोगस खते बियाणे कीटकनाशके यांच्या तक्रार निवारण व नुकसान भरपाई मिळवण्यासाठी राज्यात एक खिडकी योजना राबवण्यात यावी
- @ उसाला या वर्षी 3100 दर मिळाला पाहिजे व पहिली उचल एक रकममी 2500 रुपये मिळालीच पाहिजे.
- @ ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 अ लागू झाला त्यावेळी असणारा रिकवरी बेस 8.5% तोच कायम ठेवून नंतरच्या सर्व दुरुस्त्या अमान्य कराव्यात, 8.5% चा बेस धरूनच एफ आर पी ठरवावी...
#ऊसदर_संघर्ष_समिती
सोलापूर_जिल्हा##