अध्यक्षपदी शिवलिंग मेढेकर सोलापूर तर ज्येष्ठ विक्रेते नंदकुमार देशपांडे (पंढरपूर)यांची उपाध्यक्षपदी निवड
पंढरपूर – (विनोद पोतदार)
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी संलग्न असलेल्या सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची विक्रेता दिनानिमित्त बार्शी येथे बैठक होऊन अध्यक्षपदी शिवलिंग मेढेकर सोलापूर यांची तर पंढरपूर येथील ज्येष्ठ विक्रेते व अखिल भारतीय ग्राहक पंचायत उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .
सुरुवातीस वृत्तपत्र विक्रेता ते मिसाइल मॅन राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला वंदन करून बैठकीला प्रारंभ करण्यात आला.वृत्तपत्र विक्रेता संघाचे राज्याचे कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांनी ध्येयधोरणांबाबत माहिती दिली .या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष महेश पटवर्धन होते.
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सर्वच निवडी सर्वानुमते करण्यातआल्या.यावेळी कार्याध्यक्षपदी अरुण कोरे ,सचिवपदी सचिन बाबर , खजिनदारपदी उत्तम चौगुले, सदस्य पदी शाम थोरात ,सिद्धेश्वर सावंत ,अनिल खरात तसेच सल्लागारपदी महेश पटवर्धन यांच्या निवडी करण्यात आल्या. यानंतर बार्शी वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी बोलताना ज्येष्ठ विक्रेता ते पत्रकार असा प्रवास केलेले उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी सांगितले आपण जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकत्र येऊन आपल्यासाठी लढले पाहिजे. याकरता सर्वांनी आपसातील मतभेद विसरून संघटनेत कार्यरत असावे.
तसेच याप्रसंगी संघटना मजबूत असल्याशिवाय आपला टिकाव लागणार नाही. याकरता आपण विक्रेते बंधूनी जास्तीत जास्त संख्येने संघटनेचे सभासद होऊन संघटना मजबूत करावी असे आवाहन अध्यक्ष शिवलिंग मेढेघर व नंदकुमार देशपांडे यांनी केले आहे.
सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या सर्व सभासदांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.