निशिगंधा बँकेचे मोबाईल ॲप व क्युआर कोड सुरु कार्यप्रणालीचे उदघाटन बँकेचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते

आत्याधुनिक सुविधा देणाऱ्या सहकारी बँकांमध्ये निशिगंधा सहकारी बँकेचा समावेश 
पंढरपूर : (विनोद पोतदार)
पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेने आपल्या कार्यप्रणालीमध्ये सातत्याने सुधारणा करण्यावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून बँकेने मोबाईल ॲप व क्युआर कोडची सुविधा सुरु केली आहे. सदर कार्यप्रणालीचे उदघाटन बँकेचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते करण्यात आले.* यावेळी बँकेचे व्हा.चेअरमन आर.बी.जाधव, संचालक सतिश लाड, डॉ.आर.एम.जाधव, डॉ.मंदार सोनवणे, विवेक कवडे, विलास साळूंखे, देविदास सावंत, भागवत चवरे, ॲङ.क्रांती कदम, भानुदास सावंत, व्यवस्थापक कैलास शिर्के यांचे सह कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात कार्यक्रम पार पडला. 

*यावेळी चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले, बँकेने ग्राहकांच्या विश्वासार्हता जपत मोबाईल ॲप व क्युआर कोडच्या माध्यमातून कोठूनही रक्‍कम मागविता येणार आहे असून याचा फायदा 19 हजार खातेदारांना  होणार आहे. तसेच ॲपच्या माध्यमातून खातेवरील शिल्लक, चेकबुक सुविधा इ. सुविधांचा लाभ घेता येणार आहे. लवकरच या ॲपद्वारे रक्कम पाठविणे, मोबाईल रिचार्ज, बील भरणा यापण सोयी उपलब्ध करुन देणार आहोत असे सांगीतले. यापुर्वी देखील बँकेने सीटीएस.चेकबुक सुविधा, कोअर बँकींग सुविधा या द्वारे ग्राहकांना सेवा पुरविलेली आहे. आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून बँकेने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. लवकरच एटीएम सुविधा सुरु करणार आहोत तरी निशिगंधा परिवारातील सर्वांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.* 
या सुविधेमुळे पंढरपूर मध्ये आत्याधुनिक सुविधा देणाऱ्या सहकारी बँकांमध्ये निशिगंधा सहकारी बँकेचा समावेश झाला आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form