मंगळवेढा( प्रतिनिधी):-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा १८ वा युवा महोत्सव कार्यक्रम दिनांक ९ ते १२ ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार आहे .या महोत्सवात तरुणाईसाठी सेल्फी पॉइंट व खाद्यपदार्थ स्टाल राहणार असल्याचे सांगण्यात आले .विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा यंदाचा १८वा युवा महोत्सव आहे. या युवा महोत्सवासाठी यजमान पदाची संधी मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय मिळाली आहे.
मंगळावेढा तालुक्याला या निमित्ताने दुसऱ्यांदा संधी मिळत आहे. दिमागदार अशा पद्धतीने युवा महोत्सव साजरा होण्यासाठी येथील महाविद्यालयात शिक्षक कर्मचारी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहेत .युवा महोत्सवाचा मुख्य रंगमंच ८०बाय २५०मीटरचा इतका मोठा करण्यात आला आहे. तसेच सेल्फी पॉईंट खाद्यपदार्थ समन्वयक स्वागत कमान उभारण्यात येत आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विद्यापीठाचा यो महोत्सव झाला नसल्याचे सांगण्यात आले. सध्याही कोरोनाची सावट गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी हा प्रयत्नशील असून हा महोत्सव दिमागदार होण्यासाठी प्रयत्न राहणार असून अडीच हजार विद्यार्थ्यांचे स्वयंसेवकाची राहण्याची जेवणाची व्यवस्था केलेली आहे महोत्सव काळात विद्यार्थ्यांना चांगल्या सुख सुविधा देण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम संचालिका डॉ.मीनाक्षी कदम तेजस्विनी कदम. सचिवा प्रियदर्शनी महाडिक संचालक श्रीधर भोसले सर .रामने नेरवे शिवाजी पाटील कवी यतीराज वाकळे .दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य रवी काशीद . मुख्याध्यापक कल्याण भोसले .जयराम अलदर .अजित शिंदे सुभाष बाबर .सतीश सावंत .रमेश पवार व संभाजी नागणे उपस्थित होते
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा अठरावा युवा महोत्सव 9 ते 12 ऑक्टोंबर दरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात होणार असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढ्याचे अध्यक्ष एड.सुजीत कदम यांनी दिली.रविवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता युवा महोत्सवचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस असणार आहेत

आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. तर एकांकिका मंचाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होणार आहे.