पंढरपूर ---(विनोद पोतदार)
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील हे पंढरपूर दौर्यावर आले असतानाच, अत्यंत व्यस्त वेळापत्रकातुन वेळ काढुन, त्यांनी अखिल भारत हिंदुमहासभेचे उपाध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगावकर व पंढरपूरातील प्रसिध्द व्यापारी व शेतकरी सुहास कुलकर्णी इचगावकर यांच्या घराला भेट दिली. यावेळी खा. रणजितसिंह निंबाळकर, आ, समाधान आवताडे, आ. राजेंद्र राउत, नगर शहराचे भाजपाचे शहराध्यक्ष भैयासाहेब गंधे, हिंदुमहासभेचे नेते अभयसिंह इचगावकर, विवेक बेणारे , बाळाराव डिंगरे, महेश खिस्ते, विकास मोरे, मंदार इचगावकर ,यांचेसह संपुर्ण इचगावकर परिवार, तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. नगर शहराचे शहराध्यक्ष भैयासाहेब गंधे यांनी हा योग जुळवून आणला. यावेळी पालकमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. विशेषतः पंढरपूर शहरात येवू घातलेल्या विकास आराखड्याबाबत चर्चा झाली.
यावेळी पंढरपूरकर नागरीकांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखडा लादला जाणार नाही. असे चोख आश्वासन पालकमंत्री विखे पाटील यांनी उपस्थित शहरवासीयांना दिले. यावेळी इचगावकर परिवाराने पंढरपूरकर नागरीकांच्या वतीने पालकमंत्री विखे पाटील, यांना वीर सावरकरांचा छोटा पुतळा देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. खा. निंबाळकर , आ. समाधान आवताडे, आ. राजेंद्र राउत, भैयासाहेब गंधे यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीमुळे पंढरपूर शहरवासीयांच्या मनातील रस्तारुंदीकरणाची भिती कमी झाली.