करकंब ---लक्ष्मण शिंदे
करकंब पोलीस ठाणे येथे करकंब गावातील युवकांना सायबर क्राईम बाबत जनजागरण केले. युवकांना सायबर क्राईम बाबत होणारे फिशिंग, फेसबुक हॅकिंग, व्हॉट्सॲप हॅकिंग, हनी ट्रॅप, सेक्सट्रोशन, बनावट लोन ॲप , ओटीपी न सांगणे याबाबत सपोनि/ निलेश तारु यांनी मार्गदर्शन केले.तसेच त्यांनी सायबर क्राईम मध्ये आपले व आपले कुटुंबीयांना कसे सुरक्षित ठेवावे याबाबत सूचना दिल्या.बँक फ्राउड बाबत माहिती देवून तात्काळ संबंधीद बँकेशी संपर्क साधावा असे सांगितले. तसेच लोकांना पॉर्न वेबसाईट पासून दूर राहण्यास व सर्चिंग व डाउनलोड न करणे बाबत माहिती दिली. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व प्रक्षेपक पोस्ट करण्यापासून स्वतःला व इतरांनाही परावर्त करण्याबाबत कळविले. पोलीस हवालदार आर आर जाधव यांनी व्हाट्सअप व फेसबुक सेक्युरिटी सेटिंग कसे करायचे त्याबाबत माहिती देऊन सर्व युवकांचे व्हाट्सअप सेक्युरिटी सेटिंग जागेवरच करून घेतले व आपले मित्र कुटुंबिया यांनाही सिक्युरिटी सेटिंग करून घेण्याच्या सूचना दिल्या.सपोनी निलेश तारू यांनी सर्व युवकांना आज घेतलेले मार्गदर्शन आपल्यापुरते मर्यादित न ठेवता मित्र व कुटुंबीयांना याबाबत माहिती देऊन आणखीन जनजागरण करावे असे आवाहन केले आहे
सदरच्या सायबर क्राईम गुन्हे बाबत कार्यक्रम करिता 30 ते 40 युवक हजर होते.तसेच करकंब पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार सूळ,घोळवे,जाधव,मोरे,हरिहर, राजकर,पोलीस नाईक /हजारे,भोसले,कांबळे, जाडकर व पोलीस शिपाई फुगे हे हजर होते.