पंढरपूर ---(विनोद पोतदार)
पंढरपूर हे भुवैकुंठ नगरी आहे. . या शहराची स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. हाच ध्यास मनाशी बाळगून हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी पंढरपूर शहरातील रस्ते झाडून स्वच्छ केले. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त पंढरपूर शहरांमध्ये निघालेल्या मिरवणुकी दरम्यान ठीक ठिकाणी खाऊ वाटपाचे स्टॉल लावले जातात.. दरम्यान या खाऊ वाटपा नंतर कागद कचरा रस्त्यावर पडतो आणि तो पडलेला कचरा स्वच्छ करण्याचं काम या मिरवणुकीच्या मागे चालत असलेले मुस्लिम बांधव करत असल्याचं दिसून आले.
हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत पंढरपूर शहरातील तरुण मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांनीच हातामध्ये झाडू घेत प्रदक्षिणा मार्गसह शहरातील रस्ते स्वच्छ झाडून आपले कर्तव्य पार पाडले आणि एक चांगला संदेश दिला आहे. शहरातील रस्त्यावरील कचरा, घाण, कागद पालापाचोळा साफ करत स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर असा संदेश देत हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी केली.
संत हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचे आचरण करत पंढरपुरातील मुस्लिम बांधवांनी झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचे स्वर्ग याप्रमाणे पंढरपूर शहरातील रस्ते स्वच्छ करत आपली सामाजिक बांधिलकी जपली त्याच बरोबरच आपले जे अध्य कर्तव्य आहे ते कर्तव्य देखील पार पाडले आहे त्यामुळे मुस्लिम बांधवांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे