पंढरपूर
(विनोद पोतदार)
पंढरपूर शहरातील युवा समाजसेवक, मुजम्मिल कमलीवाले यांना कार्य गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे येथील क्रांतिसिंह नाना पाटील तरुण मंडळातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला असून ऑक्सीजन मॅन ,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते मानाचा फेटा, शाल, घड्याळ, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांना गौरवण्यात आले.
पंढरपूर शहरात कोरोना काळात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुजमिल कमलीवाले यांनी कोरोना संक्रमणाच्या काळात मोठे काम केले होते. कोरोना रुग्णांना औषधे पुरवण्यापासून ते बेड मिळेपर्यंतची सर्व मदत, त्यांच्याकडून कोरोना रुग्णांना होत होती. प्रशासनाच्या हातात हात घालून कामकरत असताना, या काळात त्यांचा मोठा नावलौकिक झाला होता. याचवेळी बेवारस, असहाय नागरिकांना दोन वेळचे जेवण तसेच आरोग्य सुविधा देण्याचा उपक्रम त्यांनी सातत्याने चालू ठेवला आहे. याच त्यांच्या कार्याची दखल घेत क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाच्या वतीने त्यांना कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ह भ प प्रसाद महाराज अंमळनेरकर, श्रीकांत शिंदे तसेच महंमद उस्ताद आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.