खंडाळी येथे कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन

खंडाळी(ता. माळशिरस)  ---
येथे रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२२—२३ च्या कृषी सल्ला केंद्राचे खंडाळी ग्रामपंचायत येथे खंडाळी सरपंच बाबुराव पताळे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
   रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूजच्या कृषीकन्या सोनाली सुर्वे ,प्रीती दुधाळ, विद्या राऊत ,अनिशा भोसले, शिवानी घाडगे, सुजाता खांडेकर, प्रणाली ढुमणे, वैष्णवी कदम यांचे कृषी अभ्यासासाठी खंडाळी येथे आगमन झाले आहे. कृषीकन्या पुढील तीन महिने खंडाळी गावातच राहून रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस एम एकतपुरे, ऍग्रो नॉमी प्रोफेसर एम एम चंदनकर प्रोग्राम ऑफिसर खराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळी गावामध्ये कृषी विद्यापीठ अभ्यासक्रम अंतर्गत गावामध्ये कृषी आधारित प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावा, शेती संबंधित व्याख्याने,  शेती संबंधित व्याख्याने अशा विविध माध्यमातून शेतकऱ्यांशी आधुनिक शेती तंत्रज्ञान संबंधी कृषीकन्या माहिती देणार आहेत रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या सर्व कृषीकन्यांचे खंडाळी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले. 
या कार्यक्रमाला खंडाळीचे सरपंच बाबूराव पताळे ,पोलीस पाटील सुभाष कटके, खंडाळी तंटामुक्त समिती अध्यक्ष गणपत पताळे, बंडोपंत भोसले ,भाऊसाहेब मस्के ,सदाशिव पताळे, दत्तात्रय पताळे, शहाजी नाना पताळे ,डॉ. विजय एकतपुरे, डॉ. रामचंद्र निकम, नारायण पताळे, विठ्ठल भोसले, गणपत खंडागळे, सुभाष गोसावी, महादेव साबळे, कुर्मुदास पताळे, शिवाजी ढाणे,अंकुश अवताडे, मधुकर खंडागळे ,दत्तात्रय वाळेकर, संजय गव्हाणे, महादेव कदम ,आदी मान्यवर आणि शेतकरी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली सुर्वे यांनी केले तर सर्वांचे आभार प्रीती दुधाळ यांनी मानले.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form