राज्यस्तरीय यशामुळे राष्ट्रीय पातळीवर झाली निवड.
पंढरपूर -----(राजेश शिंदे)
विवेक वर्धिनी कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी कला शाखेत शिकणाऱ्या राहुल बळी धोत्रे याने ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अथलेटिक्स या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई केली व या कामगिरीमुळे या कामगिरीमुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे राहुल धोत्रे यांचे वडील मोल मजुरी करून आपला घरप्रपंच चालवतात.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या राहुल याने कठोर परिश्रम करून हे यश मिळवले आहे.
त्याने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे खजिनदार माननीय सलीम वडगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना राहुलने सांगितले की श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने, विवेक वर्धिनी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत कठीण काळात मला मोलाची साथ दिलेली आहे. माझे गुरु क्रीडा शिक्षक रणदिवे सर व दळवी सर यांनी माझ्याकडून स्पर्धेची उत्तम तयारी करून घेतली. त्यामुळेच घरच्या हलाखीच्या परिस्थितीतही हे यश संपादन करू शकलो.
त्यावेळी त्याला मार्गदर्शन करणारे रणदिवे सर व दळवी सर यांनी राहुलचा आत्तापर्यंत खडतर प्रवास कसा झाला हे कथन केले त्याच्या भावी आयुष्यात सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी वडगावकर साहेब, विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य पाराध्ये सर यांनी मार्गदर्शन केले व त्याचे मार्गदर्शक शिक्षक रणदिवे सर व दळवी सर यांचाही सत्कार करण्यात आला.
जूनियर कॉलेजचे शिक्षक श्री सरगर सर यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमास विवेक वर्धिनी विद्यालयाचे पर्यवेक्षक पाटील सर पवार सर, ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख मुंडे सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.