राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 


पंढरपूर :-(विनोद पोतदार)
 राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्याहस्ते शाल, श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी आमदार अनिल बाबर,राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय आयुक्त ए.बी चासकर,अधिक्षक नितीन धार्मिक, उप- अधिक्षक आदित्य पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम,तहसीलदार सुशील बेल्हेकर,मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड तसेच महेश साठे व मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form