पंढरपूर ग्रामीण पोलीसांची कार्यवाही अवैध दारु साठा जप्त

या कार्यवाही मुळे धाबेवर होणारी देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्याचें धाबे दणाणले 

 



पंढरपूर –  शहरालगत तसेच ग्रामीण भागात धाबेंवर अवैध दारू विक्री करताना दिसून येते परंतु अनेक कारणांमुळे कार्यवाही होताना दिसत नाही परंतु या कार्यवाही मुळे सर्व स्तरातून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे 
पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत दि .11/09/2022 रोजी सायंकाळच्या सुमारास बातमीदारामार्फत पोलीसांना बातमी मिळाली की ,नवनाथ शत्रुघ्न पाटील रा. गायगव्हाण ता .सांगोला याने त्याचे मौजे तिसंगी ता .पंढरपूर गावचे शिवारातील पंढरपूर ते कराड रोडवरील अजिंक्यतारा हॉटेल मध्ये व हॉटेलचे पाठीमागे असलेल्या शेवाळे यांचे घरातील खोलीमध्ये अवैद्य देशी विदेशी दारुचा साठा केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी दोन पंचासमक्ष पोलीसांनी छापा टाकला असता सदर ठिकाणी देशी विदेशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या आहेत . एकुण 1,83,780 येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा माल मिळुन आल्याने पोलिस निरीक्षक धनंजय अ जाधव यांनी पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला . आरोपी बंडु भारत पाटील रा . गायगव्हाण ता . सांगोला यास ताब्यात घेण्यात आले आहे . हॉटेलचे मालक नवनाथ शत्रुग्न पाटील रा .गायगव्हाण ता . सांगोला जि .सोलापूर याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही .
तरी यातील आरोपी नवनाथ शत्रुग्न पाटील ( हॉटेल मालक ) व बंडु भारत पाटील वय 32 वर्षे (मॅनेजर) दोघे रा .गायगव्हाण ता . सांगोला जि .सोलापूर यांनी बेकायदा बिगरपास परमिटने कि.रु. 1,83,780 / -रु.च्या वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळुन आले म्हणुन त्यांचे विरुध्द पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. 415/2022 महाराष्ट्र दारुबंदी अधिनयम 1949 चे कलम 65 ( ई ) , 68 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form