ठेवी रु.२०६ कोटी ०९ लाख ४७ हजार,
बँकेस निव्वळ नफा रु. १ कोटी ८५ लाख
पंढरपूर ---तालुक्यातील नावाजलेले व सर्व सामान्यचा आर्थिक आधारवड असणारी
दि पंढरपूर मर्चट्स को-ऑप बँक लि.पंढरपूरची सन २९२१-२०२२ या सहकारी वर्षाची सर्वसाधारण सभा दिनांक २५/०८/२०२२ रोजी मा.श्री.वि. तथा बाबुराव म्हमाने सभागृहात बैंकचे विद्यमान अध्यक्ष श्री. नागेश आण्णासाहेब भोसले यांचे अध्यक्षतेखाली अत्यंत वातावरणात संपन्न झाली.
प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन बँकेचे वरिष्ठ सभासद श्री.श्रीधर बाजीराव पवार यांचे शुभ हस्ते करण्यात आले. मा. श्री.वि.अ. तथा बाबुराव म्हमाने यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सभेस सुरुवात झाली. त्यावेळी बँकेचे विद्यमान अध्यक्ष श्रीनागेश आण्णासाहेब भोसले यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करुन अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले .त्यामध्ये कोरोना काळानंतर उद्भवलेल्या कठीण आर्थिक प्रसंगी सभासद ठेवीदार कर्जदार यांनी बँकेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल अध्यक्ष श्री. भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.
अहवाल सालातील बँकेच्या प्रगतीचा अहवाल व्यवस्थापक श्री. अतुल महादेव म्हमाने यांनी सादर करताना बँकेचे एकूण वसूल भागभांडवल रु. ३कोटी ९२ लाख ९१ हजार, राखीव व इतर निधी रु.२८ कोटी ०२ लाख ८९ हजार ,ठेवी रु.२०६ कोटी ०९लाख ४७ हजार, कर्ज रु.१२७ कोटी ७५ लाख ५३ हजार,गुंतवणूक रु.९६ कोटी ५१ लाख ९६ हजार इतके असून बँकेचा नेट एन.पी.ए.१.९९% इतका असून, बँकेस निव्वळ नफा रु. १ कोटी ८५ लाख इतका झाल्याचे स्पष्ट केले. अहवालसालात बँकेस लेखापरीक्षकाकडून देण्यात आलेला 'अ' वर्ग तसेच चालू वर्षी सभासदांनी बँक देत असलेला १०% लाभांश याविषयी बँकेचे अभिनंदन करणारा ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केला.
सदर सभेस विद्यमान संचालक श्री.युवराज विलासराव पाटील, श्री.भारत शिवदास भिंगे, श्री. आनंद मुनिआप्पा शेटे, श्री. राजेंद्र बसवेश्वर डोंबे, श्री. शितल विद्याधर तंबोली, ऍड. श्री. भगवान वसंतराव भादुले, श्री. सोमनाथ सिध्देश्वर आंबरे, श्री. राहुल अशोक म्हमाने, श्री. किरण शंकर घाडगे, श्री. राजेश वसंतराव धोकटे, श्री. आदित्य चंद्रकलेश्वर फतेपुरकर, संचालिका सौ.मंजुश्री सुधीर भोसले, सौ. लक्ष्मी वसंतराव परचंडराव, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य प्रा. श्री. राजेंद्र सदाशिव मोरे, सी .ए. श्री. हरी उध्दव लबडे, व्यवस्थापक श्री. सुनिल गंगाधर मोहिते उपस्थित होते. याप्रसंगी बँकेचे माजी चेअरमन श्री.संजय दे. भिंगे, राजकुमार गांधी तसेच सभासद
श्री. सुधीर भोसले, वसंत परचंडराव, धिरज म्हमाने, विजयकुमार परदेशी, संजय अभ्यंकर, श्रीधर पवार, रामेश्वर यंपे, आर.बी.जाधव, रामकृष्ण जवळेकर, अमोल महिमकर, संतोष डोंगरे, श्री. शाम गोगांव ,श्री किरण भोसले आदि बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
यावेळी बँकेच्या वाटचालीच्या विविध विषयांवर चर्चा झाली. बँकेचे सभासद श्री रामेश्वर यंपे, श्री संजय अभ्यंकर, श्री. धीरज म्हमाने, या व इतरांच्या प्रश्नांना बँकेचे व्यवस्थापक श्री. अतुल म. म्हमाने यांनी समाधानकारक उत्तरे दिली,
बँकेचे संचालक श्री. राजेश व. धोकटे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.