"सहा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांची मोठी कारवाई
पंढरपूर प्रतिनिधी--
सोलापूर ग्रामीण मौजे चिंचोली ता. सांगोला जि. सोलापूर येथे "सी.एम.कृषी पर्यटन ॲग्रो रेसॉट"मध्ये मोठया प्रमाणात तंबाखुजन्य पदार्थाचा साठा करून इतरत्र वाहतुक करत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सहा. पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना तपास पथक पाठवून कारवाई करण्यात आली.त्याप्रमाणे तपास पथकातील पोसई श्री. अब्दुलहमीद शेख, पोहेकॉ/१८६ निलेश रोंगे, पोना/१४२७ विनोद शिंदे, पोकॉ/२११० शिवशंकर हुलजंती व पोकॉ/१४२३ राहुल लोंढे त्याचप्रमाणे सांगोला पोलीस ठाणेकडील पोसई श्री. पुजारी व पोलीस अंमलदार हे देखील घटनास्थळी पोहोचले. दोन्ही पथकाने संयुक्तपणे छापा कारवाई केली आहे.
"सी.एम.कृषी पर्यटन अॅग्रो रेसॉट" मधून पांढरे रंगाचा छोटा हत्ती क.एम.एच.४५/एएफ ६४०६ हा बाहेर पडत असताना व रेसॉर्टच्या पोर्चमध्ये बोलोरो पिकअप वाहन क.एम.एच.४५/एएक्स ०५३९ हा उभा असलेला दिसला. दोन्ही वाहनातील वाहन चालक व इतर लोक पोलीसांना पाहून अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेले. तपास पथकातील पो. अधिकारी/अंमलदार यांनी रेसॉर्ट मधील उघडया असलेल्या हॉलमध्ये जावून पाहणी केली असता त्या ठिकाणी निळया पॉलीथीन बॅग, बारदाणे मध्ये सुगंधी तंबाखु पाकीटे, सुपर जेम तंबाखु पाकीटे, डायरेक्टर पान मसाला बॉक्स, एस.पी. ९९९, मिराज, विमल इ. पान मसाला किं. रू.१०,६४,२१२/- रू.चा माल मिळून आला.
छोटा हत्ती क.एम.एच.४५/एएफ ६४०६ यामध्ये आर.एम.डी.पान मसाला, विमल, एम सेंटेड तंबाखु गोल्ड कंपनीचा ९,५३,७६०/- रू.चा माल व बोलोरो पिकअप वाहन क.एम.एच.४५/एएक्स ०५३९ यामध्ये शॉट ९९९ तंबाखु, डायरेक्टर पान मसाला असा तंबाखुजन्य माल १०,६३,४४४/- रू.चा माल मिळून आला आहे. पोसई श्री. पुजारी यांच्या ई साक्ष अॅपद्वारे पोसई अब्दुलहमीद शेख व पोसई पुजारी यांनी मिळून मालाची मोजदाद करून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. छोटा हत्ती व बलोरो पिकअप किं. रू.९,५०,०००/- रू.ची वाहने व तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला असा एकुण ३०,८१,४१६/- रू.चे मालाचे बॅगा असा एकुण ४०,३१,४१६/- रू.चा माल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०९/१२/२०२५ रोजी पंचनामा झाल्यानंतर छापा कारवाईमध्ये मिळून आलेला तंबाखुजन्य माल व वाहने ताब्यात घेवून सांगोला पोलीस ठाणे येथे घेवून जाण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाकडील अधिकारी आल्यानंतर सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार आहे.
सदरची कामगीरी मा.अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सो, सोलापूर ग्रामीण, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर, मा. सहा. पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत डगळे, यांचे तपास पथकातील पोसई श्री. अब्दुलहमीद शेख, पोहेकॉ/१८६ निलेश रोंगे, पोना/१४२७विनोद शिंदे, पोकॉ/२११० शिवशंकर हुलजंती व पोकॉ/१४२३ राहुल लोंढे यांनी तसेच सांगोला पोलीस ठाणेकडील पोसई पुजारी व पोलीस अंमलदार यांनी मिळून संयुक्तपणे पार पाडलेली आहे.