सांगोला ( उत्तम चौगुले):
या वर्षीचा * १५ मराठा लाईट इन्फंट्री (बुर्ज )*वर्धापन दिवस ५४वा बुर्ज दिवस सांगोला रामकृष्ण गार्डन व्हिला येथे 7 डिसेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला. या वर्धापन दिवस कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आजी माझी सैनिक ऑफिसर्स, जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वर्धापन दिनासाठी *रिटायर* ब्रिगेडियर एके गुप्ते,,ब्रिगेडियर सी .के रमेश , ब्रिगेडियर एम. एम विटेकर , कर्नल.मनोज चतुर्वेदी पुणे,कर्नल.ए.बी.जाधव.,
कर्नल.मोन्ट्रीया.,कर्नल.एम.एस. राव,*ऑनडुटी.*
कर्नल. एम.डी मुथप्पा ,कर्नल.प्रसाद पुरोहित,कॅप्टन. मयंक व ज्युनिअर कमिशन ऑफिसर्स व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शानदार सैनिक मेळाव्यासाठी १५ मराठा बटालियन मधील 1971 च्या लढाई मधील वीर हिरो उपस्थित होते या वीर हिरोंचा सत्कार वरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सर्व महाराष्ट्रातून आलेल्या माजी सैनिक 15 मराठा बटालियन बुर्ज या सर्वांना विठ्ठल रुक्माई या संतांच्या भूमीची आठवण म्हणून मूर्ती सप्रेम भेट म्हणून देण्यात आली तसेच कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण जवळ्याचे शाहीर सुभाष गोरे यांनी 15 मराठा बटालियनचे शहीद जवान पांडुरंग साळुंखे यांना केंद्रबिंदू धरून पोवाडाचे सादरीकरण अगदी भावनिक पद्धतीने केले आणि सर्वजण या पोवाड्यामध्ये मंत्र मुग्ध झाले कार्यक्रमाला साथ होती डीजे आयोजक अक्षय चंदनशिवे यांची तसेच ब्रिगेडियर ऐ.के गुप्ते साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक कार्यक्रमाचे आयोजक ऑनररी कॅप्टन रावसाहेब साळुंखे *सेना मेडल* यांनी सोलापूर जिल्ह्याचा इतिहास संतांची भूमी पर्यटनासाठी विषयी जिल्ह्याची ओळख डिजिटल मीडिया द्वारे सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभेदार विजयकुमार सावंत तसेच आभार प्रदर्शन हवालदार व आक्रुर शिंदे यांनी केले