सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अकलूज पोलीस पथकाचा विशेष गौरव

पोलीस निरीक्षक निरज उबाळे व त्यांच्या टिमचे उत्कृष्ट तपास कार्याबद्दल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान 

संग्रामनगर  (केदार लोहकरे यांजकडून)
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आज मंगळवार ०९ डिसेंबर २०२५ रोजी अकलूज पोलीस स्टेशनच्या एका कर्तव्यनिष्ठ पथकाचा महत्त्वपूर्ण गुन्ह्याचा जलद आणि यशस्वी तपास केल्याबद्दल विशेष गौरव केला. पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात सहायक पोलीस निरीक्षक सपोनि लंगुटे,पोलीस हवालदार पो. ह. पठाण, पो.ह.बकाल, आणि पो.ह.रणजित जगताप यांचा समावेश होता.
        अकलूज पोलीस ठाण्यात गुरनं ७२५/२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१ (२), आणि ३८५ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निरज उबाळे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी वेळेत आणि उत्कृष्टपणे पूर्ण केला. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान या उत्कृष्ट तपास कार्याबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक निरज उबाळे,सपोनि योगेश लंगुटे,पो.ह.समीर पठाण, पो.ह.अमोल बकाल आणि पो.ह.रणजित जगताप यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
             पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या गौरवास्पद उद्गारात कर्मचाऱ्यांनी तपासात दाखवलेले तपास कौशल्ये आणि कर्तव्यनिष्ठा याची प्रशंसा केली. आपल्या सेवेचा महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो.आपण भावी काळात असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावीत रहाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल,असे गौरवास्पद उद्गार अतुल कुलकर्णी यांनी काढले.या कर्मचाऱ्यांच्या तपासणीच्या आदर्श कार्यामुळे अकलूज पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असून, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढण्यास मदत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form