तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या विजयी निर्धार सभेत सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार....
पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूरचे मालक म्हणून येथे गेली चाळीस वर्षे ते सत्ताधारी आहेत.यांना गोरगरीबांचे काही देणे घेणे पडलेले नाही. यांना शहराचा विकास करायचा नाही. फक्त यांच्या बगल बच्यांचा आणि स्वत:चा विकास करावयाचा आहे.यासाठी यांना सत्ता हवी आहे.अशी घणाघाती टीका तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके यांनी सत्ताधारी गटावर केल्याचे पाहवयास मिळाले.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांची जाहीर प्रचार सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थावर आयोजित केली होती. यावेळी उपस्थित हजारो नागरिकांना भगीरथ भालके संबोधित करत होते. यावेळी उमेदवार डॉ. प्रणिता भालके, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, साईनाथ भाऊ अभंगराव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, रणजित बागल,महेश साठे यांची भाषणे झाली.
या विजयी निर्धार सभेत जनतेशी संवाद साधताना डॉ. प्रणिता भालके म्हणाल्या की,पंढरपूर शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या 40 वर्षापासून सत्ता आहे, मात्र पंढरपूर खड्यात घालण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.पंढरपूर शहरात नळांना पुरेशा दाबाने पाणी येत नाही.यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.पंढरपूर नगरपालिकेत गेली पंचवीस वर्षेत केलेले काम हे जनतेने सहन केले,आता जनता सहन करणार नाही.
स्वत:साठी सत्ता पाहिजे,लोकांच्या हितासाठी यांना सत्ता नको आहे.गेल्या चाळीस वर्षात यांनी स्वत:चाच विकास केला.नगरपरिषदेच्या सत्तेचा स्वतासाठी वापर करुन घेतली आहे.त्यांना पंढरपूर शहराचा विकास करावयाचा नाही.त्यांना विकासाचे व्हिजन मांडावयाचे नाही.त्यामुळे ते व्हिजन मांडत नाहीत.आम्ही व्हिजन मांडून पुढे आलो आहे.भगिरथ भालके म्हणाले की मायबाप जनतेने सारासार विचार करुन तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.