पंढरपूर (दि. १५ ऑक्टोबर २०२५):
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभाग आणि IEEE विद्यार्थी शाखेच्या संयुक्त विद्यमाने IEEE दिवसाचे औचित्य साधून शाखेच्या उद्घाटन सोहळ्यासह तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व प्रमुख वक्ते डॉ. शशिकांत एस. पाटील, (सल्लागार, IEEE महाराष्ट्र विभाग व प्रादेशिक संपर्क समन्वयक (Region 10 व MGA) वरिष्ठ सदस्य, IEEE) हे होते. त्यांनी "Leveraging IEEE for Career Growth, Networking and Opportunities" या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. पाटील यांनी त्यांच्या प्रभावी सादरीकरणातून IEEE म्हणजेच (Institute of Electrical and Electronics Engineers) या आंतरराष्ट्रीय संघटनेची व्याप्ती, उद्दिष्टे व विद्यार्थी सदस्यत्वाचे फायदे उलगडून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, IEEE हे फक्त एक सदस्यता नसून, जागतिक दर्जाचे तांत्रिक ज्ञान, संशोधन, नेतृत्व विकास आणि करिअर संधींचे व्यासपीठ आहे.
IEEE चे सदस्य होणे म्हणजे जागतिक स्तरावरील नेटवर्किंग, रिसर्च पेपर सादर करणे, आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी होणे आणि विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणे होय. विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शिक्षणाच्या कालावधीतच IEEE चा लाभ घेतल्यास, भविष्यातील करिअर उभारणीसाठी त्याचा मोठा उपयोग होतो, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. के. शिवशंकर (विभाग प्रमुख, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व IEEE ब्रांच काउन्सेलर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे (IEEE ब्रांच मेंटर), डॉ. एस. जी. कुलकर्णी (उपप्राचार्य व IIC अध्यक्ष), समन्वयक प्रा. के. पी. जाधव, आणि कु. अनघा कुलकर्णी (IEEE स्टुडन्ट ब्रांच चेअर) हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये IEEE बद्दल उत्सुकता वाढवून, तांत्रिक प्रावीण्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. अर्चना जाधव व कु. सानिका बाबर यांनी केले, तर प्रा. दत्तात्रय कोरके यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
Tags
शैक्षणिक वार्ता