पंढरपूर प्रतिनिधी--
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तालुका शाखा माळशिरस येथील मा. श्रीमती.श्वेतांबरी एकनाथ राऊत मॅडम (अंगणवाडी पर्यवेक्षिका) यांची *जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था नि.क्रं.01 सोलापूर* च्या *चेअरमन* पदी निवड झाली. पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच माळशिरस तालुक्याला चेअरमन पद मिळालेले असून सदरची बाब ही नक्कीच अभिमानास्पद आहे. या निवडीबद्दल *नूतन चेअरमन मा. श्रीम. श्वेतांबरी एकनाथ राऊत मॅडमजी* यांचे *महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तालुका शाखा माळशिरस* मार्फत यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी महासंघाचे माळशिरस तालुका अध्यक्ष तथा माळशिरस ता. जि. प. सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री. धन्यकुमार अशोक काळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्मचारी महासंघाकडून नूतन चेअरमन यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
Tags
सामाजिक वार्ता