राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षतालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर-वसंतनाना देशमुख


पंढरपूर प्रतिनिधी-- 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा पदाधिकारी तसेच तालुकाध्यक्ष निवडी जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांनी दिली.
लवकरच नगर पालिका, नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका जाहीर होतील. त्या दृष्टीने पक्ष बांधणे करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन कार्यकारणी करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील १० तालुका अध्यक्षांच्या निवडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, आ. रोहित पवार, माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मान्यतेनुसार तसेच खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. अभिजीत पाटील, आ.उत्तमराव जानकर, आ.नारायण पाटील, आ. राजू खारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख व जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र भाऊ पाटील यांनी तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या.
माळशिरस देविदास ढोपे, माढा बाळासाहेब पाटील, अक्कलकोट बंदेनवाज कोरबू, करमाळा अमरजीत साळुंखे, दक्षिण सोलापूर दत्तात्रय बोडके, मोहोळ विजयकुमार पाटील, पंढरपूर अतुल चव्हाण, मंगळवेढा पांडुरंग चौगुले, बार्शी महेश चव्हाण, सांगोला दत्तात्रेय सावंत यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. लवकरच शहराध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी, मतदार संघ अध्यक्ष इतर सर्व निवडी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख व जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form