डेटा सायन्स, वेब डेव्हलपमेंटसारख्या विषयांवर तज्ज्ञांशी परस्परसंवादी सत्रे
पंढरपूर, दि. ३० सप्टेंबर २०२५
एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी न्यूजेन सॉफटेक, पंढरपूर येथे शैक्षणिक औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक कार्यप्रणालीचा अनुभव देणे तसेच शैक्षणिक ज्ञान व उद्योगातील प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील दुवा निर्माण करणे हा होता.
या भेटीदरम्यान कंपनीतील तज्ज्ञांनी डेटा सायन्स, वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग आणि फ्रंट-एंड डेव्हलपमेंट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानांवर आधारित परस्परसंवादी सत्रे घेतली. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना उद्योगातील नवीनतम प्रवाह, प्रकल्पांतील वापरले जाणारे तंत्रज्ञान, कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समस्यांचे निराकरण कसे केले जाते याची सखोल माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी या भेटीत उत्साहाने सहभाग घेतला व तज्ज्ञांशी अनेक प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण केली. या चर्चेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली असून उद्योग क्षेत्रातील आवश्यक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांनी हा अनुभव प्रेरणादायी, ज्ञानवर्धक व समृद्ध करणारा असल्याचे सांगितले.
ही शैक्षणिक भेट मा. प्राचार्य डॉ. के. जे. करांडे व संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. विभागातील प्राध्यापकवर्गाने भेटीचे नियोजन, समन्वय व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
Tags
शैक्षणिक वार्ता