*वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान शिव सैनिक*.*श्री. महेश भैय्या धाराशिवकर यांचे अतुलनीय कार्य*...

वाढदिवस विशेष लेख --
नेतृत्वाचा वारसा अनेकांना चालत येतो. या नेतृत्वात संवेदनशीलता असेलच असे नाही. परंतू ज्यांना नेतृत्वाचा वारसाही नाही आणि सर्व सामान्यांच्या प्रश्नावर ज्याला कळवळा, दया येतो असे नेतृत्व हे अपवादानेच उदयाला येते. सर्व सामान्यातून उदयास आलेल्या नेतृत्वामध्ये एक प्रकारचे संवेदनशीलता भरलेली असते. त्याच बरोबरीने आक्रमकताही तेवढ्याच तीव्रतेने असते हे दिसून येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूर शहरातील एक युवा नेतृत्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा श्रद्धावान शिवसैनिक श्री. महेश भैय्या धाराशिवकर या धडपडत्या युवकाच्या रूपाने पाहवयास मिळते.
वेगवेगळ्या माध्यमातून आणि एक ध्येय समोर ठेऊन सर्व सामान्याप्रती असलेला जिव्हाळा, अनेक आंदोलने व अनेक प्रश्नांची सोडवणूक करताना त्यांच्यातील संवेदनशीलतेचा प्रत्येय नेहमीच पाहायला मिळतो. तसेच सोलापूर शहराच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात अतुलनीय असणारे सोलापूर जिल्हा सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष श्री. महेश भैय्या धाराशिवकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

श्री. महेश धाराशिवकर हे त्यांच्या युवा  कार्यकर्त्या मध्ये भैय्या या नावानेच परिचित आहेत. विध्यार्थी संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या राजकीय कारकिर्दीस त्यांनी सुरुवात केली. शिवसेनेच्या ज्वलंत विचाराशी निष्ठा ठेऊन विध्यार्थी दशेमध्ये अनेक प्रश्न, छोटया मोठया अडीअडचणी सोडवत हा युवा नेता मोठमोठी आंदोलनेही करू लागला. अल्पवधितच त्याने सोलापूर शहरात आपल्या कार्य कर्तृत्वाने स्वतःचा ठसा उमटविला. केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यापेक्षा त्याने लोकांचे प्रश्न सोडवण्याला अधिक महत्व आणि प्राधान्य दिले. विध्यार्थी सेनेचे प्रमुख पद त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा खरा विकास झालेला दिसून येतो. न्याय मागण्यासाठी त्यांचा आक्रमकपणा अगदी उफाळून आलेला दिसतो. विध्यार्थी सेनेचे काम करीत असताना त्यांनी युवकांची एक मोठी फळी उभी केली. सर्व सामान्य घरातील युवकांना चळवळीमध्ये आणून त्याने त्यांच्यातील स्वाभिमान जागृत केला. परंतू न्याय मिळवून देताना मात्र त्याने कशाचा ही विचार केलेले नाही. युवकांचे मोठे संघटन करण्याचे कौशल्य त्याच्या अंगात जन्मजात दिसून येते. युवकांच्या प्रश्नांची जाण त्यांना आहे. युवकांप्रति त्यांची असलेली आत्मीयता नेहमीच दिसून येते त्यामुळेच त्यांच्या जवळ आलेला युवा कार्यकर्ता आणि पक्ष विरहित मित्र परिवार त्यांच्या पासून दूर गेलेला  दिसून येत नाही. त्यांचे हे कार्य पाहून विध्यार्थी सेना उप प्रमुख, त्यानंतर विध्यार्थी सेना प्रमुख आणि शहर उत्तर विधानसभा मतदार संघ समन्वयक हे पद सुद्धा देण्यात आले. या पदाची जबाबदारी त्यांनी अतिशय जबाबदारीने पार पाडली. शिवसेनेची विचार सरणी घेऊन सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविताना त्यांच्यातील संवेदनशील मन मात्र त्याने जपून ठेवले. त्यांच्या या गुणामुळेच अनेकांना अनेकांना महेशभैय्या आपलासा वाटतो. अनेक जण त्याला आपल्या जवळचा समजतात आणि तो लोकांची कामे तेवढ्याच आत्मीयतेने करताना दिसतात. शिवसेना नेते श्री. पुरुषोत्तमजी बरडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ती सर्व सामान्यांची कामे तळमळीने करत आहे. त्यामुळे च सर्व स्तरात त्यांचे नांव घेतले जाते.

विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, सुवर्णं कारागीरांचे प्रश्न त्याचंबरोबर सर्व सामान्यांच्या नागरी समश्या सोडविणे आणि याच बरोबर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सतत कार्यरत राहणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पैलू आहेत. त्यांनी केलेले छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अथवा इतर कोणत्याही ठिकाणी केलेले आंदोलन हे लक्ष वेधी ठरते. त्याचंबरोबर शालेय युवा युवतीना स्व संरक्षणाचे धडे देण्यासाठी लाठी, काठी, दांडपट्टा, कराटे, तलवार बाजी प्रशिक्षणासाठी उन्हाळा आणि दीपावलीच्या सुट्टीत आपला अमूल्य वेळ देताना मी पाहत आलोय. सर्व सामान्यातून तयार झालेले हे युवा नेतृत्व उत्तरोत्तर खुलत राहावे हीच सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा असून अशा नेतृत्वाला पाठबळ मिळणे आवश्यक आहे. श्री. महेश भैय्या धाराशिवकर हा युवक तळमळीने सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न, धडपड करतो. समाजातील प्रत्येक क्षेत्रात त्याचा वावर आढळतो. प्रत्येक क्षेत्रातील लोकांशी वागताना त्याचा नम्रपणा नजरेत भरणारा असतो. त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्याकडे आदराने पाहतो. वेळ प्रसंगी नम्र असणारा हा युवा नेता आक्रमक ही होताना दिसतो. त्याच्यातील संवेदनशीलता हीच त्याची खरी ओळख आहे. त्यांच्या या गुणांची दिवसेंदिवस वाढ व्हावी, त्यांचे नेतृत्व अधिकाधिक बळकट व्हावे, त्यांच्या सर्व संकल्पनाना यश मिळावे व त्यांच्याकडून सतत अखंडित अशी जनसेवा घडावी हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे व समाज दैवत श्री. संत नरहरी महाराजांच्या चरणी नम्र प्रार्थना आहे.
-- वसंत पोतदार सोलापूर.
मोबा. 9423065915

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form