वृत्तपत्र विक्रेत्यांना शासनाने सामाजिक प्रतिष्ठा देऊन निवृत्तीवेतन दिले पाहिजे - ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज

मंगळवेढा प्रतिनिधी --
 महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता सोलापूर संघटनेच्या सौजन्याने 15 ऑक्टोबर या वाचक दिना चे अवचित्त साधून हा वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 त्यावेळी कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प सुधाकर इंगळे महाराज बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले की, दररोज घडणाऱ्या घडामोडी वृत्तपत्रात छापल्या जातात अशी वृत्तपत्रे पहाटेपासूनच घराघरांमध्ये पोहोचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेता करीत असतो वृत्तपत्र विक्रेत्याला जरी समाज प्रतिष्ठित समजत नसला तरी ही प्रतिष्ठा त्याच्या कामावर अवलंबून नसून त्याने समाजासाठी सेवाभावी वृत्तीने केलेल्या कामामुळे वृत्तपत्र विक्रेता देखील समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्तीच आहे असे ते म्हणाले 
 
यावेळी व्यासपीठावर दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे अध्यक्षपदी उपस्थित होते, तसेच कोषाध्यक्ष गोरख भिलारे, जिल्हाध्यक्ष शिवलिंगआप्पा मेढे गार सचिव सचिन बाबर, संपादक ज्ञानेश्वर भगरे,सल्लागार महेश पटवर्धन उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना इंगळे महाराज म्हणाले की, अनेक वृत्तपत्र विक्रेते व एजंट गेल्या 40-50 वर्षापासून वृत्तपत्र वितरणाचे काम वयाच्या 80 वर्षापर्यंत करीत आहेत त्यांना शासनाने निवृत्तीवेतन सुरू करावे तसेच शासनाच्या अनेक योजनांचा त्यांना लाभ द्यावा महाराष्ट्रातील साडेतीन लाख वृत्तपत्र वितरकांचे शासन महामंडळ स्थापन करावे यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागेल असे ते म्हणाले.
 यावेळी कोषाध्यक्ष गोरख भिलारे मनाले की वृत्तपत्र विक्रेत्यांना मानधन व कमिशन मिळण्यासाठी ही संघटना कार्यरत असून शासनाकडे पाठपुरावा करीत आहे तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवलिंग आप्पा मेढेगार म्हणाले की वृत्तपत्र विक्रेता च्या संघर्षातून त्यांना कमिशनमध्ये वाढ करण्यास यश मिळवले आहे यावेळी माजी जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले सांगोल्याचे शेटे यांनीही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या एकजुटीला पाठिंबा दिला. 

या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव मोरे यांनी केले व आभार बाळासाहेब नागणे यांनी मांडले. या कार्यक्रमाचे संयोजक मंगळवेढा तालुका वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष विजय भगरे  यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form