पंढरपूर ता.१२:
सप्टेंबर महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात पूर आला. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले. यामुळे ते आर्थिक संकटात सापडले त्यांना मदत म्हणून विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री श्री किशोरजी चव्हाण आणि गुजरात येथील गरुडेश्वर स्वामी समर्थ देवस्थान यांच्या संयुक्त तसेच पंढरपुरतील विश्व हिंदू परिषद , बजरंग दल वतीने जीवनावश्यक वस्तूंचे १७० किट कुटुंबांना भेट देण्यात आले.
माढा तालुक्यात दारफळ आणि निमगाव मध्ये पूर आल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेले. त्यांना स्थलांतर करण्यात आले. त्यांच्या घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या. त्यांना मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आव्हानास पंढरपूर येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्याकडून दारफळ आणि निमगाव येथील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे १ लाख ७० हजार रुपयाचे किट देण्यात आले या एका कीटमध्ये १९ जीवनावश्यक वस्तू एकत्र करून ₹१००० किंमतीचे १७० किट देण्यात आले.
यावेळी गुजरात येथील गरुडेश्वर स्वामी समर्थ देवस्थानचे कार्यकर्ते श्री व सौ.गुप्तेजी ,सौ.अन्नपूर्णा मॅडम तसेच विभाग सहमंत्री श्री विजयकुमार पिसे, सहमंत्री श्री गोपाळ सुरवसे ,बजरंग दलाचे कार्यकर्ते अक्षय मेनकुदळे, विठ्ठल अभंगराव, जय सुरवसे, सत्यजित कळकुंबे, गोपाळ सुगंधी,उज्वल मोहोळकर, अविनाश कळकुंबे, चैतन्य कुलकर्णी, माही रजपुत आदी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता