*कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक – सहकाराच्या इतिहासातील अमर नाव!संघर्षातून साखर कारखाने उभे करून सहकाराचे दीप प्रज्वलित ठेवणारे, पंढरपूरच्या मातीचे खरे दैवत ठरलेले सुधाकरपंत यांचे हे स्मारक आणि विस्तारीकरण प्रकल्प शेतकऱ्यांच्या प्रगतीचे नवे पर्व उघडणार आहे. त्यामुळे श्रीपूरचा हा सोहळा ठरणार ऐतिहासिक!
मा.आ.प्रशांत परिचारक*
पंढरपूर प्रतिनिधी --
सहकार क्षेत्रात मोलाची कामगिरी करत महाराष्ट्र शासनाचा “सहकार भूषण”, “वनश्री” तसेच भारतातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा मान मिळवणारा कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि., श्रीपूर आता नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे.शेतकऱ्यांच्या घामातून स्वप्न उभं करणाऱ्या, सहकार क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरणाऱ्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि १० हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप व पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभाचा सोहळा बुधवारी (दि.१५ ऑक्टोबर २०२५) रोजी दुपारी २.३० वाजता श्रीपूर येथे होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे अनावरण व शुभारंभ मा. ना. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
तर अध्यक्षस्थानी:मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य विशेष उपस्थिती:मा. ना. जयकुमार गोरे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री, सोलापूरमा. ना. बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्यमा. ना. शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे, कृषी मंत्रीमा. खा. विजयसिंह मोहिते-पाटील,मा. आ. राजनजी पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद (कॅबिनेट दर्जा)स्थळ: कारखाना कार्यस्थळ, श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील सर्व आजी-माजी खासदार आणि आमदार, मा. आ. प्रशांतराव परिचारक (चेअरमन), डॉ. यशवंत कुलकर्णी, (कार्यकारी संचालक), श्री. कैलासराव खुळे, व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, सभासद शेतकरी व कर्मचारी वृंद तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
Tags
सामाजिक वार्ता