बिल्डर असोसिएशनच्या चेअरमनपदी समाधान काळे तर उपाध्यक्षपदी संजय साठे

पंढरपूर प्रतिनिधी- 
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया संलग्नित पंढरपूर सेंटरच्या चेअरमनपदी यशराज एंटरप्राइजेसचे प्रमुख समाधान काळे तर उपाध्यक्षपदी संजय साठे यांची एकमताने निवड करण्यात आली. पंढरपूर बिल्डर असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आ. समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. 

यावेळी राज्याचे बिल्डर असोसिएशनचे चेअरमन जगन्नाथ जाधव, सेक्रेटरी मनोज देशमुख, माजी चेअरमन दत्तात्रेय मुळे, पुणे सेंटरचे चेअरमन अजय गुजर, कार्यकारी अभियंता अमित निमकर, सोलापूर सेंटरचे चेअरमन संतोष कलकुटगी, प्रणव परिचारक, युवराज चुंबळकर, अशिष शहा, आर. बी. जाधव, कांतीलाल डुबल, धनाजी बागल आदी उपस्थित होते. 

पदग्रहण समारंभात सचिव सुजित पाटोळे, सहसचिव सीताराम माने, खजिनदार रणजित लोंढे-पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी युवा नेते प्रणव परिचारक, उद्योजक मुन्ना भोसले, विवेक साळुंखे यांनी असोसिएशनचे सभासदत्व स्वीकारले. प्रास्ताविक उपाध्यक्ष संजय साठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी तर सहसचिव सीताराम माने पांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form