पंचायत समिती सभापतीपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर


सोलापूर प्रतिनिधी--
जिल्ह्यातील ११ पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत आज शुक्रवारी निघणार आहे. ही सोडत दुपारी एक वाजता नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली आहे.
----------------------------------------
 *जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आरक्षण* 
अक्कलकोट- ओबीसी महिला
बार्शी -सर्वसाधारण महिला
सांगोला -सर्वसाधारण महिला
करमाळा -ओबीसी सर्वसाधारण
माढा -सर्वसाधारण
पंढरपूर -अनुसूचित जाती सर्वसाधारण
माळशिरस- सर्वसाधारण
मंगळवेढा -सर्वसाधारण महिला
मोहोळ -ओबीसी महिला
दक्षिण सोलापूर -सर्वसाधारण
उत्तर सोलापूर -अनुसूचित जाती (महिला)
-------------------------------------- 
सभापतीपदाची आरक्षण सोडत ही अडीच वर्षांसाठी आहे. त्यासाठी शासनाकडून अधिसूचना जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठीची प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करण्यात आली आहे. ११ पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांच्यासाठी पंचायत समिती गठीत होऊन नंतरच्या दिवसापासून सुरू होणाऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षण आहे. 

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह,आजी माजी पदाधिकारी ,सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, समाजसेवक , नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form