सोलापूर शहर व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जीवघेणी डीजे, डॉल्बी, लेझर लाईट वर आजीवन कायमस्वरूपी बंदी आणावी


सोलापूर दि. 26  :-
 *सोलापूर शहर व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात  जीवघेणी डीजे, डॉल्बी,  लेझर लाईट वर आजीवन कायमस्वरूपी बंदी आणावी* अश्या मागणीचे निवेदन स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस प्रमुख व शहर पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
     स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे , संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, विश्वस्त तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात यांच्या नेतृत्वाखाली व सर्व विश्वस्त व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.
     डीजे व डॉल्बी मुळे अनेकांना आपले गमावावे जीव लागले आहे तर लेझर लाईट मुळे अनेकांना अंधत्व आल्यामुळे त्याचे जीवन अंधकार मय झाले आहे अश्या डीजे, डॉल्बी व लेझर लाईट वापरास आजीवन कायम स्वरूपी बंदी आणावी असे लेखी निवेदन स्वराज्य माहिती अधिकार संघटना जिल्हा सोलापूर च्या वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. 
     सोलापूर चे जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक, शहर पोलीस आयुक्त यांना ही या निवेदनाद्यारे या बंदीचे मागणी केली आहे.
   या प्रसंगी स्वराज्य चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक, विश्वस्त व महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्दी प्रमुख उमेश काशीकर, सदस्य अजित सवाई, विष्णु पंपटवार, राजकुमार परदेशी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form