एसकेएन सिंहगड महाविद्यालय पंढरपूर येथे “महिला सशक्तीकरण आणि कार्यरत महिलांसाठी आवश्यक कायदे” याविषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन


पंढरपूर प्रतिनिधी --
सिहंगड महाविद्यालयामध्ये अँन्टी रँगीग सेल मार्फत महिला सशक्तीकरण आणि कार्यरत असणा-या महिलांसाठी आवश्यक ते कायदे या विषयावर कायदेतज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र आयोजित केले होते.  कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली.  त्यानंतर प्रा.अंजली पिसे यांनी प्रमुख पाहुणे मान्यवर ॲड. सुप्रिया शिर्डले (कोतवाले) यांचा सत्कार करण्यात आला.


ॲड. सुप्रिया शिर्डले यांनी रँगीग विरोधी कायदे, तसेच पिडीत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या तक्रार निवारण यंत्रणाबददल सविस्तर माहिती दिली.  महिलांच्या हक्काविषयी, कार्यस्थळी महिलांसाठी असलेल्या कायद्याविषयी तसेच महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी आवश्यक बाबी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  तसेच शोषणविरोधी कायदे, लैंगीक छळ प्रतिबंधक कायदा आणि कायदेशीर संरक्षण याविषयी सखोल माहिती दिली.

महिलांनी, विद्यार्थिंनींनी स्वत:च्या हक्काबद्यल जागरुक रहावे. कोणत्याही अन्यायाला वाचा ही फोडलीच पाहीजे, गरज भासल्यास कायदेशीर मदत घ्यावी व आपले सरंक्षण स्वत: कसे करता येईल, आत्मनिर्भर कसे बनता येईल याकडे लक्ष दिले पाहीजे. असा महत्वपूर्ण संदेश सुप्रिया मॅडम यांनी दिला. ॲड. सुप्रिया यांनी ब-याच कायदयाविषयी सखोल माहिती सांगीतली त्याचा उपयोग नक्कीच कार्यरत असणा-या महिला व विद्यार्थींनींना भविष्यात होईल असा विश्वास अँन्टी रँगीग सेलच्या प्रा.अंजली चांदणे यांनी व्यक्त केला.
विद्यार्थींनींमध्ये, कार्यरत महिलांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उददेशाने असे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबविले जातात, जेणेकरुन महाविद्यालयीन वातावरण सुरक्षित होण्यास मदत होईल,  अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.जे.करांडे यांनी दिली.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अँन्टी रँगीग सेलच्या प्रा.अंजली चांदणे, प्रा.अंजली पिसे, सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. 
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कु.श्रध्दा पंधे व अर्चना जाधव या विद्यार्थीनींने केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form