पंढरपूर प्रतिनिधी --
सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र माचणूर ता. मंगळवेढा येथील श्री सिध्देश्वर मंदिरात श्रावण अणुष्ठान सोहळा साजरा केला गेला. मंदिर समिती व माचणूर येथील ग्रामस्थ यांचेवतीने महिनाभर भजन-पुजन व धार्मिक विधी उत्साहात पार पडले.
तर रविवार दि 24.08.2025 रोजी सदर अणुष्ठानाचा समाप्ती सोहळा मोठ्या भक्ती-भावात साजरा झाला. पंढरपुर येथील प्रसिध्द गायक श्री. दिलीप टोमके व सौ. सोनाली भाळवणकर रा. पंढरपुर यांचे श्री गणेश महिला भंजनी मंडळ यांनी सुमधुर भजन सेवा सादर केली.
कै. माधव नागेश पाठक रा. पंढरपुर यांचे स्मरनार्थ त्यांची कन्या सौ. सोनाली सदाशिव भाळवणकर यांनी या सोहळ्यास रु. एक लाखाची देणगी दिली. गेली पंधरा वर्षे दर साल सोनाली भाळवणकर यांचे वतीने एक लाख देणगी दिली जाते. मंदिर समिती व माचणूर ग्रामस्थ यांचे वतीने महाप्रसादाचे आयोजन केले गेले. सुमारे पाच हजार लोकांनी प्रसादाचा लाभ गेतला.
मंदिर समिती माचणूर ग्रामस्थ याचे वतीने माचणूरचे सरपंच याचे हस्ते सौ. सोनाली भाळवणकर यांचा सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाल
Tags
धार्मिक वार्ता