पंढरपूर प्रतिनिधी --
श्री गणेश उत्सव आगमन व समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त माजी नगरसेवक श्री.सोमेश यावलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला येथे दत्त मंदिर महादेव गल्ली मंदिरामध्ये भव्य तबला वादन स्पर्धा 29 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती.
या तबला वादन स्पर्धेमध्ये देवळे येथील श्रवण नवनाथ माळी या बालकाचा लहान गटामध्ये परीक्षक. पंडित अतुल ताडे सर व व त्यांचे शिष्यवर्ग यांच्या निरीक्षणाने प्रथम क्रमांक दिला. श्रवण माळी यांचा प्रथम क्रमांक आल्यामुळे मा.नगरसेवक सोमेश यावलकर सर यांच्यातर्फे श्रवण माळी यांना 7001 रुपये रोख रक्कम बक्षीस प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव करून त्याचे अभिनंदन केले.
श्रुती स्वरा क्लासचे गायन क्लास घेणारे पंडित श्री रामदास रोंगे (नाना) गुरुजी, तबला क्लास घेणारे श्री.सुधाकर कुंभार गुरुजी, श्री. धनंजय रोंगे गुरुजी, मच्छिंद्र कोळेकर, चिंतामणी खांडेकर, शिवाजी अनपट, व हनुमान भजनी मंडळ देवळे, व त्यांची आजी गोदाबाई माळी वडील श्री नवनाथ माळी व आई वंदना माळी बहीण श्रावणी माळी, व चुलते नागनाथ माळी, डॉ. मोहन माळी, दिलीप वसेकर, समाधान वसेकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Tags
सामाजिक वार्ता