दिनांक 29 ऑगस्ट 2025.
सोलापूर : भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यालयात २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाजपा क्रीडा प्रकोष्ठाच्या वतीने गणरायांचे पूजन व हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
हा कार्यक्रम भाजपा सोलार शहर जिल्हा अध्यक्ष सौ. रोहिणीताई तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार, पीडब्ल्यूडीचे श्री.मनोज ठाकरे साहेब, रुद्र अकॅडमीच्या संचालिका सौ. संगीता जाधव, अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार विजेते प्रशिक्षक श्रीकांत शेटे, राष्ट्रीय खो-खो खेळाडू श्री. अजित सांगवे, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रशिक्षक श्री. सुनील देवांग, वस्ताद हिंद केसरी विजेते श्री. भरत मेकाले, लाठी-काठी महासंघ अध्यक्ष श्री. शिवराम भोसले, हॉकी कोच डॉ. उज्वल मलजी, आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल पंच श्री. अनिल गिराम, क्रीडा भारतीचे प्रांत मंत्री श्री. ज्ञानेश्वर म्याकल आदी मान्यवर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू मृण्मयी देशपांडे (बॅडमिंटन), श्रावणी सूर्यवंशी (डायव्हिंग), संकेत कुलकर्णी (कराटे), पंचाक्षरी लोणार (बॉडी बिल्डिंग), तन्मयी शिंदे व तनिष्का ठोकळ (बॅडमिंटन व धनुर्विद्या), यशवर्धन निगडे व अथर्व पाठवले (धावणे) यांच्यासह अनेक उदयोन्मुख खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास भाजपा शहर जिल्हा सरचिटणीस विशाल गायकवाड, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने, महेश देवकर, विजय कुलथे, सागर अतनुरे, अनिरूद्ध पाटील तसेच शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता