*एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “संविधानाची पंच्याहत्तरी” विषयावर प्रेरणादायी व्याख्यान*

पंढरपूर | दि. ०४ ऑक्टोबर २०२५
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील एससी/एसटी/ओबीसी सेल आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने “संविधानाची पंच्याहत्तरी” या विषयावर एक प्रेरणादायी अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अधिवक्ता तुकाराम राधाकृष्ण चिंचणीकर, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी (पुणे शाखा) उपस्थित होते. त्यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक अधिवक्ता रामेश्वर कोरे यांचा सन्मान उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केला.

अधिवक्ता चिंचणीकर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून भारतीय राज्यघटनेचा ७५ वर्षांचा प्रवास, तिची मूलभूत तत्त्वे, सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्ये यांवर सखोल विचार मांडला. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्ये केवळ पाठ्यपुस्तकापुरती न ठेवता, ती आचरणात आणून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले.
या व्याख्यानामार्फत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता, नागरिक म्हणून असलेली जबाबदारी, आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती कार्यक्रमाच्या यशाचे द्योतक ठरली.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता, नागरिक म्हणून जबाबदारीची जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्रा. अमोल कांबळे (संविधान सेल समन्वयक) यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form