सोलापूरच्या सौं. चित्रा पोतदार : मिस महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानीत....


जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा वेध घेणारा लेख....
आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील कर्तृत्ववान महिलांना  सकारात्मक माहिती देणारे एकमेव न्यूज चॅनेल म्हणून ख्याती असलेले टी. व्ही. महाराष्ट्र न्यूज  प्रस्तुती मुख्य प्रायोजक बारामतीची सुवर्ण पेढी चंदू काका सराफ सह प्रायोजक सोलापूर तरुण भारत आणि यश डेव्हल्पर्स व धूत सारीज यांच्या संयुक्त विध्यमाने सोलापूरच्या सौं. चित्रा वसंत पोतदार यांच्या प्रशासकीय आणि सामाजिक कार्याची नोंद घेऊन मिस महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा.
त्यांच्या जीवन कार्याचा वेध घेणारा हा लेख.
सोलापूर येथील कष्टाळू वृत्ती, सर्व धर्म सम भावी  वागणूक, अध्यात्मिकता इंचगेरी संप्रदायाचे अनुयायी श्री बाळकृष्ण पोतदार जमखंडीकर व सौं तारामती बाळकृष्ण पोतदार या दाम्पत्याच्या पोटी दिनांक 29 नोव्हेंबर 1957 रोजी एका कन्यारत्नाने जन्म घेतला. ते कन्या रत्न म्हणजेच मिस महाराष्ट्र पुरस्काराच्या मानकरी सौं. चित्रा वसंत पोतदार. वडील लक्ष्मी विष्णू मिल मध्ये कारकून आई गृहिणी. दोन बहिणी तीन भाऊ असे आठ जणांचे कुटुंब तुटपुंजे उत्पन्न, तीन भाऊ, तीन बहिणी सर्वांच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नव्हते म्हणून यांचे प्राथमिक शिक्षण नेहरूनगर येथील जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण जागृती विद्यामंदिर नेहरूनगर या शाळेत झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात झाले त्यांनी बी. ए. ऑनर्स ही पदवी मिळवली. पोतदार कुटुंबातील ही कन्या 22 मे 1983 रोजी  भुरीकवठे तालुका अक्कलकोट येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री. रामचंद्र काशिनाथ पोतदार यांचे तृतीय चिरंजीव वसंत पोतदार यांचेशी  विवाह बद्ध झाल्या. वसंत पोतदार हे महसूल खात्यात सेवेत होते. विवाहानंतर सौं चित्रा पोतदार याना सोलापूर पाटबंधारे खात्यात अनुरेखक म्हणून नोकरी मिळाली. जन्मताच त्या हुशार असल्याने पाटबंधारे खात्याची परीक्षा पुणे विभागात पहिल्या संधीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यांना पुढे यथावकाश सहाय्यक आरेखक या पदावर पदोन्नती मिळाली. प्रामाणिकपणे व पूर्ण निष्ठेने त्यांनी सेवा बजावली. तेहतीस वर्षे प्रदीर्घ सेवा करून दि. 30 नोव्हेंबर 2015 रोजी शासन सेवेतून निवृत्त झाले. नोकरीत त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक अवार्ड मिळाले. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचे झाल्यास त्या अतिशय प्रेमळ, कुटुंबवत्सल, शिस्तप्रिय, हजर जबाबी आहेत. नीटनेटकेपणा व परखडपणा हे गुण त्यांच्या स्वभावात आहेत.पती वसंत पोतदार हे नायब तहसीलदार या पदावरून दि. 31 मे 2014 रोजी सेवा निवृत्त झाले. त्यांचे पती वसंत पोतदार यांना सामाजिक कार्याची प्रचंड ओढ.सध्या ते सोनार समाजाचे अध्यक्ष असून विविध सामाजिक उपक्रम राबवतात त्यांच्या प्रत्येक उपक्रमात सौं चित्रा यांचा सक्रिय सहभाग राहतो. कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते हे सौं चित्रा पोतदार यांनी आपल्या संघर्षमय जीवन प्रवासातून सिद्ध करून दाखविले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. समाज सेवेतील एक आदर्श म्हणून ही त्या परिचित आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारे, जिद्दीने संघर्ष करत मोठे यश मिळवणारे आणि तरीही जमिनीवर राहून सामाजिक बांधिलकी जपणारे असे सौं. चित्रा पोतदार यांचे व्यक्तिमत्व निश्चितच प्रेरणादायी आहे.
समाजात काम करताना त्यांनी आपल्या कुटुंबाची तेवढीच काळजी घेतली. आपल्या दोन्ही मुलावर त्यांनी उत्तम संस्कार केले. त्यांना उच्च शिक्षण दिले. मोठे चिरंजीव किरण पोतदार बँक ऑफ इंडिया मध्ये चीफ मॅनेजर ( लीगल डिपार्टमेंट ) म्हणून कार्यरत असून ते विवाहित आहेत. त्यांची पत्नी सौं अंबिका याही उच्च शिक्षित असून एम फार्म. आहेत. त्यांना कु. ईशानी व कु. प्रिशा या दोन कन्यारत्न आहेत. धाकटे चिरंजीव कौस्तुभ हे एम. बी. ए.असून परराष्ट्रीय औषध कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. सौं. चित्रा यांनां खेड्यात सासर मिळून ही नोकरीच्या माध्यमातून स्वयं सिद्धा होण्याबरोबरच त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळविली आहे. सध्याच्या मुलींना ग्रामीण भागातील स्थळ नको आहे. पुणे, मुंबई येथील स्थळ हवे असते. मुलींना लग्नानंतर शहरात राहण्याची ओढ असते. मोठ्या शहरात करियर होऊ शकते असे गृहीत धरून खेड्यातील स्थळ नाकारले जाते. लग्नानंतर शिकलेल्या मुली खेड्यात गेल्या, खेड्यात त्या स्वतःच उद्योग, व्यवसाय करून त्या स्वयं सिद्धा होण्याबरोबरच सामाजिक प्रतिष्ठा मिळविलेल्या अनेक महिला ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण भागात आपुलकी, मान सन्मान मिळतो, खेड्यातही शहरातील सर्व सोयी सुविधा आहेत म्हणून खेड्यातील स्थळ नाकारू नये असे त्यांचे म्हणणे आहे.महिला दिनाच्या निमित्ताने त्या समस्त महिला वर्गासाठी संदेश देऊ इच्छितात कीं, महिलांनी शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. कठीण प्रसंगाला न डगमगता धैर्याने तोंड दिले पाहिजे. स्वसंरक्षणासाठी तयार असले पाहिजे. आपले कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करण्याची जिद्द व चिकाटी स्वतःमध्ये ठेवावी. कुटुंबाबरोबर इतरही जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सबळ होणे काळाची गरज आहे. निर्भय बनून पुरुषाच्या बरोबरीने कार्य केले पाहिजे. बेटी बचाव, बेटी पढाव या योजनेतून मुलगी किती महत्वाची आहे. हे समाजाला पटवून द्या. सध्या सुनेच्या छळाच्या बातम्या अधून मधून वृत्त पत्रातून बातम्या वाचावयास मिळतात. तेंव्हा सुनेची सासू न होता सुनेची आई व्हा आणि नातवंडाची लाडकी आजी, ग्रँड मॉ व्हा असा मोलाचा संदेश देतात.
एक आदर्श मुलगी, आदर्श माता, आदर्श पत्नी, आदर्श भगिनी, आदर्श सासू व सोनार समाजातील सर्व भगिनींची सावली, प्रेमळ माय म्हणून मला सौं. चित्रा पोतदार यांचा अभिमान आहे.या प्रेमळ माऊलीला परमेश्वर उदंड निरोगी आयुष्य देवो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करून, आज सर्वत्र जागतिक महिला दिन सप्ताह संपन्न होत आहे. अशा या महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त सौं. चित्रा पोतदार यांना हार्दिक शुभेच्छा. विपरीत परिस्थितीला झुंज देऊन त्यांनी यश संपादन केले त्या निमित्ताने त्यांना मानाचा मुजरा !

*शब्दांकन - श्री.आण्णा दीक्षित 
                सोलापूर* 
 मोबा.98903 96868

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form