घाणीचे साम्राज्य ; सफाईचे काम प्रभावीपणे करण्याची नितांत गरज
दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे करण्यात येतात, पण ती प्रभावीपणे होत नसत्त्याचे समस्या कायम असते. यंदा पावसाळा नजीक आला तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे तरी शहरातील अनेक नाल्यांची सफाई झालीच नाही काही ठिकाणी कामे केली जात आहेत. परंतु ती चांगल्या पद्धतीने होण्याची गरज आहे.
शहरात एखादा मोठा पाऊस झाला तर नागरी भागांमध्ये पाणी शिरण्याचे प्रमाण मोठे आहे. नगरपालिकेच्या वतीने पूर्वखबरदारी म्हणून मान्सूनपूर्व नालेसफाई केली जाते. पण ही कामे प्रभावीपणे होत नाहीत. म्हणूनच शहरी भागातील
सर्वसाधारणपणे कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. सध्या होणाऱ्या अवकाळी पावसामुळे हा कचरा नाल्यात जाऊन नाले तुंबण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते
सध्या शहरात प्रभागानुसार नाले साफसफाई सुरू करण्यात आली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे शहर व हद्दवाढ भागात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते.नाल्याचीदेखील हीच स्थिती आहे. येथे प्रचंड गाळ, माती साचलेली आहे. सध्या शहरातील नाल्यांची भयानक स्थिती पाहता नालेसफाईच्या कामाविषयी शंकाच आहे. नालेसफाईचे कागदोपत्री घोडे नाचविले जात असल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाले तुंबून नागरी वस्त्यांना त्याचा त्रास सोसावा लागतो.
नालेसफाईचे काम प्रभावीपणे होण्याची नितांत गरज आहे
याठिकाणी प्रशासनाने खास लक्ष देऊन आवश्यक उपायोजना राबविण्याची नागरिकांची अपेक्षा आहे. ती गतीने करण्याची गरज आहे. पावसाळा नजीक आल्याने नालेसफाईसोबत ड्रेनेजसफाईची कामेदेखील सुरू करावीत ही कामेदेखील प्रभावीपणे होण्याची गरज आहे.
चौकट
संभाजी चौक परिसरात कालच्या अवकाळी पावसाने गुडघाभर पाणी साठले होते तसेच उमदे गल्ली,माळी गल्ली, नागपूरकर मठ, भाजी मंडई अशा अनेक ठिकाणी व प्रदक्षिणा मार्ग परिसरात कालच्या अवकाळी पावसाने ड्रेंनेस तुंबुन पाणी साठले असल्याने नागरिक व व्यापारी त्रस्त झालेले दिसुन आले .
Tags
सामाजिक वार्ता