पंढरपूर प्रतिनिधी --
शाळांच्या परीक्षा आटोपून उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यानंतर आता पंढरपूरमध्ये समर कॅम्प 2024 सुरू होत आहे. गेली 6 वर्ष सलग मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. यावर्षी देखील दिव्य स्पोर्ट्स क्लब आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिर 2024 समर कॅम्प यासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये शिबिराबद्दलचा उत्साह दिसून येत आहे.
शिक्षणही ऑनलाइन झाल्याने मुले तास न तास वेळ मोबाइलवर घालवायला लागली. प्रत्यक्ष मैदानी खेळ, शारीरिक श्रम यापासून मुले दुरावली आहेत. उन्हाळी शिबिरांद्वारे काही प्रमाणात का होईना ते बाहेरच्या जगाशी जुळतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो. मोबाइलच्या दुनियेत गुंतलेल्या मुलांना यामुळे मैदानावर येण्याचे प्रोत्साहन मिळेल. नवीन मित्रमंडळीशी भेटीगाठी झाल्यावर त्यांचा मानसिक शारीरिक विकासदेखील होईल.
Tags
शैक्षणिक वार्ता