पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू

पंढरपुर तालुक्यातील  इच्छुक सरपंच ६१ तर सदस्य ४२३ जणांचे अर्ज दाखल 

पंढरपूर ---
   पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये  सर्वच  राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे तसेच गावातील गट सामाजिक संघटना गावातील पुढारी या सर्वांनी आपापल्या पद्धतीने मोर्चे बंद केले असून थेट सरपंच निवड असल्याकारणाने गाव गावामध्ये सर्व आनंदाचे उत्साहाचे वातावरण असून या 11 गावांमध्ये सध्या जोरात  प्रचार यंत्रणा काम करीत आहे शुक्रवार रोजी अर्ज भरण्याचे शेवटची तारीख असल्या कारणे अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती.
  पंढरपूर तालुक्यांमध्ये अकरा गावामध्ये सरपंच पदासाठी ६२ उमेदवाराने अर्ज दाखल केला असून ग्रामपंचायतची सदस्यांसाठी एक जागेसाठी ४२३अर्ज दाखल झालेली आहेत
तालुक्यातील पंढरपूर येथील सरपंचपदासाठी मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. आपल्या समर्थकांसह गटागटाने येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी वेळ वाढवण्यात आल्याने उमेदवारांची रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यालयात गर्दी होती.
दाखल अर्जाची छाननी ५ डिसेंबर रोजी होणार आहे. ७ डिसेंबर रोजी दुपारी तीन  वाजेपर्यंत उमेदवारी माघारी घेता येणार आहेत. अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form