प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यास स्थानिक नागरिक, व्यापारी,मठाधिकारी, वारकरी , महिला यांचा सहपरिवार मोर्चा काढून तिव्र विरोध
पंढरपूर(विनोद पोतदार)
पंढरपूर शहर विकास आराखडा जो चुकीच्या पद्धतीने बनवला आहे आणि स्थानिक नागरिक व वारकरी यांना विश्वासात न घेता तसेच आराखडा व काॅरिडोर बाबत योग्य मार्गदर्शन केले नाही पंढरपूर नगर परिषद प्रशासनाने याबाबत कोणतीही माहिती बाधीत नागरिक, व्यापारी यांना दिली नाही व विश्वासात घेतले नाही म्हणून तो रद्द झाला पाहिजे
त्यामध्ये सुधारणा करून पंढरपूर शहर व्यापारी आणि नागरिकांचे कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही आणि बाधीत नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोबदला कशा पद्धतीने मिळणार किंवा जमिन जागा किती जाणार याबाबत कोणतीही माहिती ते योग्य पद्धतीने देत नाहीत अशा विविध मागण्या या मोर्चा दरम्यान होत होत्या प्रशासनाने यासाठीचा नवीन विकास आराखडा तयार करावा या मागणीसाठी पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर नामदेव पायरी जवळून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नगरपालिकेवर व्यापारी आणि नागरिक यांचा मोर्चा काढून हा आराखडा रद्द करावा या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी गजानन गुरव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना देण्यात आले.
यावेळी प्राजक्ता बेणारे,साधना भोसले आदी विविध महिला संघटना, तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील महिलांचा विशेष सहभाग होता.त्याच बरोबर मनसे नेते दिलीप बापू धोत्रे,कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुण भाऊ कोळी ,नगरसेवक सुधीर धोत्रे, नगरसेवक लखन चौगुले ,नगरसेवक महादेव धोत्रे ,नगरसेवक संजय बंदपट्टे ,मी वडार अध्यक्ष दत्ता भोसले ,मा नगरसेवक महमद उस्ताद ,मा नगरसेवक धनंजय कोताळकर, मा नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर ,मा नगरसेवक किरण घाडगे ,मा नगरसेवक सतीश अप्पा शिंदे,नागेश काका भोसले, युवक नेते प्रणव परिचारक,समता परिषद नेते अनिल अभंगराव ,नगरसेवक लक्ष्मण पापरकर, मा नगरसेवक विवेक बेणारे ,मनसे व्यापार जिल्हा अध्यक्ष जयवंत भोसले ,मनसे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील,वीर महाराज, नाना कवठेकर, बाबा महाजन जिल्हा उप प्रमुख साईनाथ बडवे मनसे उपप्रमुख गणेश पिंपळनेरकर,युवक नेते ,नगरसेवक विक्रम पापरकर ,अनिल अभंगराव, शैलेश बडवे, ऋषी उत्पात,नागेश इंगोले, श्रीकांत हरिदास ,शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय घोडके, ओंकार देवडीकर, गणेश लंके, वैभव बडवे ,मंगेश मंजुळ इत्यादी उपस्थित होते.