राष्ट्रीय महास्वराज भुमी पार्टीच्या अतिरिक्त सचिव आणि महाराष्ट्र सह - प्रभारी म्हणून यशवंत पवार नियुक्त


सोलापूर - प्रतिनिधी 
      राष्ट्रीय महास्वराजभुमी पार्टीच्या  महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अतिरिक्त सचिव आणि महाराष्ट्राचे सह-प्रभारी म्हणून यशवंतजी शिवाजी पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे नियुक्ती पत्र राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे , यशवंत पवार हे पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पहात असून महाराष्ट्रभर त्यांचा गाजावाजा आहे महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यातील हजारो पत्रकारांनी त्यांच्या सोबत संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रम आंदोलन निवेदन यामध्ये सहभाग घेतला असून आज राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीने त्यांच्या कामाची दखल घेत यशवंत पवारांना  महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अतिरिक्त सचिव आणि महाराष्ट्राचे सह-प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे .
या जबाबदर पदाला मी पूर्णपणे न्याय देईन---यशवंत पवार 
नुकतेच पत्रकार सुरक्षा समिती चे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांची राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अतिरिक्त सचिव आणि महाराष्ट्राचे सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आजपर्यंत पवार हे वंचित पिडीत घटकांसह महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आपल्या धारदार  लेखणीने प्रशासनावर आसूड ओढून न्याय मिळवून देण्याचे काम केले असून आता राष्ट्रीय महास्वाराज भूमी पार्टीने नवी जबाबदारी दिली असून त्या पदाला त्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार असून सर्वसामान्यांसह पत्रकारांच्या प्रश्नांवर आणखीन आक्रमकपणे काम करणार असल्याचे यशवंत पवार यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form