राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या १८ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार

पंढरपूर  तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
१८ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अधिकृत घोषणा होणार 

पंढरपूर ----
ऑक्टोंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपण्याऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका  येत्या १८ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असून यामध्ये पंढरपूर  तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तुंगत, बार्डी, खरातवाडी, मेंढापूर, अजोती, खेड भोसे, व्होळे, नेमतवाडी, टाकळी, गुरसाळे, पुळुजवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. ऑक्टोबर २०२२ डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील सार्वत्रिक निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदासह थेट सरपंच  संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम असा आहे.
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ २८/११/२०२२ (सोमवार) ते दिनांक ०२/१२/२०२२ (शुक्रवार) स. ११.०० ते दु. ३.०० पर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक५डिसेंबर,नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक ७ डिसेंबर,निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ ७ डिसेंबर ३ वाजेपर्यंत.मतदानाचा दिनांक १८ डिसेंबर  मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक २० डिसेंबर.
      
     १८ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या ११ ग्रामपंचायतच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येते आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form