पंढरपूर शहर रनर असोसिएशन व विनोद राज लटके मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने
पंढरपूर ---
पंढरपूर शहर रनर असोसिएशन व विनोद राज लटके मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार समाधान दादा अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार मॅरेथॉन शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विनोद लटके यांनी दिली
आमदार शालेय मॅरेथॉन स्पर्धा दि. 20 नोव्हेबंर 2022 वार रविवार रोजी सकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या स्पर्धेची सुरुवात करण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये इयत्ता चौथी ते सहावी व सातवी ते नववी या लहान मोठ्या गटातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग घेता येणार आहेत, या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषक म्हणून लहान व मोठ्या गटासाठी सायकल बक्षीस ठेवण्यात आले आहे, तर द्वितीय पारितोषिक म्हणून लहान व मोठ्या गटासाठी ट्रॅक सूट बक्षीस देण्यात येणार आहे, तर तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट शूज बक्षीस देण्यात येणार आहे, तरी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आव्हान विनोद राजे लटके मित्रपरिवार पंढरपूर यांच्यावतीने करण्यात आली आहे.