विविध सामाजिक व राजकीय पदावर काम करत असताना त्यांनी समाज उपयोगी विविध कामे केली, यांच्या या निवडीने पंढरपूर तालुक्यातील मातंग समाज बांधवांमध्ये नवचैतन्य
पंढरपूर (प्रतिनिधी)
राज्यातील मातंग समाज समन्वय समितीच्या युवक आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी अनिल कसबे यांची निवड घोषित करण्यात आली आहे. या समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय बबनराव बोदडे यांनी हे नियुक्तीपत्र जाहीर केले आहे. त्यांच्या निवडीची बातमी कळताच, पंढरपूर शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. अनिल कसबे मित्र मंडळाने पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
पंढरपूर शहरातील अनिल कसबे हे सध्या मूळ शिवसेनेचे शहर कार्याध्यक्ष आहेत. तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेना तसेच सरचिटणीस भारतीय जनता पार्टी या पदावर ही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मातंग समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम त्यांनी नेहमीच केले आहे. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ते नेहमीच चळवळीत राहिले आहेत. शाहू , फुले, आंबेडकर आणि
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर नेहमीच राहिला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन , मातंग समाज समन्वय समितीने त्यांची युवक आघाडीच्या राज्य कार्यकारणीवर निवड केली आहे. या आघाडीचे राज्याचे उपाध्यक्षपद त्यांच्यावर देऊन मोठी जबाबदारी सोपवली आहे.
सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर , तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आदी संघटनांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलेल्या, अनिल कसबे यांची महाराष्ट्र राज्य मातंग समाज युवक आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीने पंढरपूर तालुक्यातील मातंग समाज बांधवांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.