गोष्ट एका असिमित अशा धैर्याची, साहसाची जिद्दीची,वैश्विक जलपरी --कु.किर्ती नंदकुमार भराडीया सोलापूर

ध्येयाने वेडी असलेली माणसच इतिहास घडवू शकतात आणि शहाणी माणसं ती वाचतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे ,हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय ते  सोलापूरच्या किर्तीने

किर्ती सोलापूरची
लेखन---
श्रीनिवास पोटाबत्ती
शाखा व्यवस्थापक
रतनचंद शहा सह बँक लि.,
शाखा पंढरपूर

एकत्र कुटुंब पद्धती च एक अनोखे उदाहरण . आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण असा परिवार. घरात sportsman spirit च वातावरण. आईवडिलांची इच्छा ,निरंतर प्रोत्साहन यातून उदयास आलेली किर्तीमान किर्ती.. अवघे वय वर्ष 16 . विश्वविक्रमाचा ध्यास घेतलेली हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्वाची प्रचंड आत्मविश्वास , सकारात्मकता, इच्छा शक्ती , जिद्द , चिकाटी च्या जोरावर  महासागराला आपल्या कव्हेत घेणारी l महासागराच्या लाटावर स्वार होऊन इतिहासाचा नवा अध्याय रचणारी ही चिमुकली परी म्हणजे किर्ती भराडीया. 
वडिलांचा आदर्श घेऊन वयाच्या सहाव्या वर्षी पाण्यात उतरलेली आणि वयाच्या आठव्या वर्षापासून श्री श्रीकांत शेटे सरांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचा अखंडित यज्ञ सुरू झाले. वय वर्ष 10 असताना सन 2017 मध्ये पुण्याच्या बालेवाडीत 100 मीटर शर्यतीत तिला हार पत्करावी लागली व 1500 मीटर शर्यतीत तिने न  थांबता न थकता यश संपादन केले. 100 मीटर मध्ये हरली परंतु 1500 मीटर शर्यतीत तिने विजय मिळवला. याच वयात तिला sea swimming ची ओढ निर्माण झाली आणि ती 1km शर्यतीची मालवण, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, चिपळूण या किनारपट्टीवर स्पर्धेत भाग घेतली .वडीलांना वाटलं की आपण तिची एकदा परीक्षा घ्यावी या उद्देशाने शेटे सरांशी चर्चा केली त्यानंतर तिने अखंडित पणे 6 तासाची  यशस्वी घोडदौड सुरू केली. किर्ती चा आत्मविश्वास वाढला. तिचे प्रशिक्षक व वडील तिला motivate करून तिचे mindset केले की तु आणखी काही तास न थांबता न थकता अखंडितपणे पोहू शकतेस आणि तो पहिल्या विक्रमाचा दिवस निश्चित करण्यात आला. 
दिनांक 11.08.2019 रोजी न थांबता न थकता 12 तास 15 मिनिटे तब्बल 34.50 km अंतर कापून काढली आणि सोलापूरच्या नव्हे जलतरणाच्या इतिहासात किर्ती चां झेंडा रोवला गेला. तिचा आत्मविश्वास दुणावला आणि अखेर तिने वडील व प्रशिक्षक यांच्याशी चर्चा करून विश्वविक्रमाची तयारी सुरू केली. तब्बल नऊ महिने अखंड परिश्रम घेऊन दररोज 9-10 तास सराव आणि मुंबई च्या समुद्रात 45 दिवसात 6 वेळा सरावकरिता उडी घेतली. आणि अखेर विश्व विक्रामाचा दिवस उजाडला. दिनांक 24.11.22 रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबई च्या sealink वरुन उडी घेतली आणि तब्बल 7.22 तास अखंडीत पने पोहत समुद्री जीवाशी लढत, ऊन, समुद्राचे खारे पाणी, घाण पाणी, पाण्याचा उलट मारा आणि थंडी या सर्वाचा सामना करत फक्त चॉकलेट्स l पाण्यावर तिने हा विश्वविक्रम पूर्ण केला. 
या यशाचे श्रेय ती सम्पूर्ण परिवारास देते हे विशेष. 
किर्ती ला घडवणाऱ्या तिचे आई वडील, प्रशिक्षक व भरादिया परिवाराचे अभिनंदन.तिच्या भविष्य कालीन वैश्विक जलतरण प्रवासास अभूतपूर्व शुभेछा..!

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form