हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या भीमा विकास पॅनल चा दणदणीत विजय...

भीमा शेतकरी विकास पॅनलच्या विजयाचे श्रेय शेतकरी सभासदचे असून मी गेल्या दहा वर्षांत दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे 
विरोधकांची चारी मुंड्याचीत पाटील परिचारक पॅनलचा धुवा

पंढरपूर ---
   भिमा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत पंढरपूर मोहोळ मंगळवेढा या तीन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांचा कार्यक्षेत्र असणाऱ्या भिमा कारखाना निवडणुकी निमित्त राजकीय खलबत्ते झाली एकमेकांवर चिखलफेक करण्यात आली परंतु गेल्या १०वर्ष ज्यांनी कारखाना व्यवस्थीत चालवला तसेच ऊस उत्पादक शेतकरी व कामगार, सभासद यांच्या अडचणी सोडविल्या , कारखाना नैसर्गिक अडचणीत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केले आशा  संसद रत्न धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांचा भीमा विकास पॅनल ने घवघवीत यश संपादन केले आहे.
#चौकट# 
भीमा शेतकरी विकास पॅनलच्या विजयाचे श्रेय शेतकरी सभासदचे असून मी गेल्या दहा वर्षांत दिलेला शब्द पाळला आहे आणि  एका वर्षात इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभा करणार,चांगला दर, योग्य वजन काटा, सभासद शेतकरी यांच्या हिताचे निर्णय यामुळेच आमचा विजय, मी राज्यसभा खासदार असल्याने मोहोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकास कामासाठी कटाक्षाने लक्ष घालून काम करणार असे ते विजयानंतर बोलताना म्हणाले.

     भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी सोलापूर येथे मत मोजणीस सुरुवात झाली.या मध्ये पहिल्या फेरीत मध्ये एकूण १७ गावातील मत मोजनी करण्यात आली.त्या मतमोजनीत  पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील ७ हजार ५०० मतांंची मोजणी पूर्ण झाली आहे. त्या मध्ये भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या ‘कपबशी’ (भीमा शेतकरी विकास आघाडी)ला आघाडी मिळाली आहे.  त्यामुळे मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील सभासद,महाडिक समर्थकांनी जल्लोष केला.
मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल दोन फेरीत होणार असून पहिल्या फेरीचा निकाल हाती लागला आहे. पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील ७५०० मतांची मोजणी झाली आहे. दुसऱ्या फेरीतही तेवढच मतदान आहे. दुसरे फेरीमध्ये खासदार धनंजय महाडिक हे आघाडीवरचआहेत.
     संध्याकाळी उशीरा अधिकृत निकाल जाहीर होणार असल्याचे माहीत मिळत आहे. त्यांची भिमा कारखान्यावर एक हाती सत्ता येणार आहे.(दुसऱ्या फेरीचे अधिकृत माहिती न मिळाल्याने आकडेवारी देत नाही)आतापर्यंतच्या मतमोजणीत खासदार धनंजय महाडिक यांची ‘कपबशी’ (भीमा विकास पॅनेल) आघाडीवर आहे.

  या निवडणुकीत एकूण १९ हजार ४३० पैकी १५ हजार ३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या फेरीत महाडिक गटाने आघाडी घेतली आहे.मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील महाडिक समर्थकांनी तसेच शेतकरी सभासद यांनी मोठ्याप्रमाणात जल्लोष  केला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form