पंढरपूर ---(विनोद पोतदार)
प्रथम वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2022 रोजी स. ९ ते दु. २ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन श्रीपाद क्लिनिक काणे हॉस्पिटल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, पद्मावती मंदिराच्या समोर ,पंढरपूर येथे करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. श्रीराज काणे व डॉ.शर्वाणी काणे यांनी दिली.
रुग्णांची सेवा गेल्या चार पिढ्यापासून डॉक्टर काणे परिवार करितात व सामाजिक भान ठेवून रुग्णांना उत्तम सेवा सुविधा ते आज पर्यंत देत आलेले आहेत ,त्याचाच भाग म्हणून त्यांनी काणे क्लिनिक व हॉस्पिटल येथे फक्त १००/-₹यात हिमोग्लोबिन, रक्तातील चरबीचे प्रमाण, रक्तातील साखरेचे प्रमाण, थायरॉईडची तपासणी, हाडांची घनता तपासणी,दमा , फुफ्फुसाची तपासणी,ब्लड प्रेशर तसेच तज्ञ डॉ.यांचा सल्ला मार्गदर्शन असा कार्यक्रम शिबिरात आयोजित केले आहे .
या आरोग्य तपासणी शिबिरात पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा व आपल्या उत्तम आरोग्य लाभावे यासाठी आरोग्य तपासणी गरजेचं आहे असे मत डॉ.काणे यांनी सांगितले.