नोंदीचा पुर्ण ऊस गाळप केला जाईल.- भैरवनाथ शुगर लवंगी चेअरमन ----- प्रा. शिवाजीराव सावंत

नोंदीचा पुर्ण ऊस गाळप केला जाईल.- भैरवनाथ शुगर लवंगी चेअरमन -----         प्रा. शिवाजीराव सावंत

  मंगळवेढा (नारायण माने):
      यावर्षी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध असुन भैरवनाथ शुगर नोंदीचा सर्व ऊस गाळपास आणणार आहे, त्यामुळे शेतकर्‍यांनी काळजी करू नये असे आश्वासन चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगरचा ९ वा गळीत हंगाम शुभारंभ उपविभागीय पोलिस अधिकारी सौ.राजश्री पाटील, ह.भ.प.सद्गुरू समर्थ व्हनमोरे महाराज व धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजी काळुंगे यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत, व्हा.चेअरमन अनिल सावंत व आदित्य अनिल सावंत उपस्थित होते.सुरवातीस उपविभागीय पोलिस अधिकारी सौ.राजश्रीताई पाटील यांच्या हस्ते ऊस वजन काटा पूजन व ऊसाने भरलेल्या वाहनांचे विधीवत पूजन करण्यात आले.सत्यनारायण पुजा इंद्रजीत पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.उर्मिला यांचे शुभहस्ते करण्यात आली.

कार्यक्रमाचे वेळी चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक आरोग्य मंत्री  ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठीमागील ८ गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहेत.आजपर्यंत ज्या विश्वासार्हतेवर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केलेले आहेत त्याच विश्वासावर चालू गळीत हंगाम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.यासाठी लागणारी सर्व ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले.कारखान्याचे संस्थापक ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी कारखान्याचे ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट दिलेले आहे ते आम्ही पूर्ण करू असे आश्वासन व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी यावेळी दिले.यावेळी दामाजी संचालक बसवराज पाटील, तानाजी काकडे, गौडाप्पा बिराजदार, आरटीओ ऑफिसर माने साहेब, बाळासाहेबांची शिवसेना तालुका अध्यक्ष अशोक चौंडे, युवसेना अध्यक्ष स्वप्नील निकम  श्रीपती माने, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर,तानाजी चव्हाण, समाधान जाधव, शाम गोगाव, जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, प्रॉडक्शन मॅनेजर बाळासाहेब शिंदे, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण,शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, एच आर मॅनेजर संजय राठोड, ईडीपी मॅनेजर नवनाथ चव्हाण, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, फायनान्स अकौंटंट देवानंद पासले, इलेक्ट्रिक इंजिनीअर राजाराम कोरे,सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार यांच्यासह परिसरातील सरपंच, मान्यवर, पत्रकार बांधव व ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी-वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form