पंढरपूर शहरात परतीच्या पावसाने हाहाकार जगदंबा वसाहत, अंबाबाई झोपडपट्टी, सेंट्रलनाका, लेंडकी नाला लगतचा परिसर बाजारपेठ, भाजीमंडई, संतपेठ, भोसले चौक, दाळे गल्ली , संभाजी चौक, तानाजी चौक, आदी अनेक ठिकाणी पावसामुळे लोकांच्या घरात पाणी घुसले. ड्रेनेज चोकोब झाल्यामुळे मैलामिश्रीत पाणी लोकांच्या घरात गेले व रस्त्यावरही आले,वाहन चालक व पादचारी , लहान व्यापारी अशा नागरिकांच्या अनेक समस्या व अडचणींवर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी प्लॅन तयार करून रेनवॉटर हारवेस्टींग चे काम हाती घ्यावे. अनेक भागातील गटारी बुजवल्यामुळे पावसाचे पाणी जाण्यासाठी वाटच नाही. त्यामुळे अनेक लोकांच्या घरात, दुकानांत व रस्त्यावर पाणी साठून रहात आहे त्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान होत असून आरोग्य ही धोक्यात आहे.
परतीच्या पावसामुळे दोन महिन्यांपूर्वी जे खड्डे बुजविले होते ते खड्डे पुन्हा मोठ्याप्रमाणात रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे अपघात ही वाढत आहेत. काॅलेज चौक ते सरगम चौक येथील तसेच रेल्वे पुलाखाली खड्ड्यांमुळे तेथे पाणी साठल्याने वाहतुक मंदावली असून ट्रैफिक जाम होत आहे. हे सर्व खड्डे तात्काळ बुजवून वाहतूक सुरळीत व सुरक्षीत करण्यासाठी प्रयत्न करावेत.
तसेच पंढरपूर शहारामध्ये कचऱ्याचे ढीग दिसत असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वेळेवर कचरा उचलण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहेत. अनेक रस्त्यावर पाणी बरोबर माती वाहत येते चिखल मोठ्या प्रमाणात साचले आहे, तेथे धुळ असल्यामुळे लोकांच्या नाकात, तोंडात, डोळ्यांत धुळ जावून लोकं आजारी पडत आहेत. रस्त्यावरील धुळ काढणारी मशीन धुळ खात पडलेली आहे खड्डे बुजवताना मुरुम टाकल्यामुळे रस्त्यावर धुळेचे व मातीचे साम्राज्य वाढत आहे. यासर्व अडचणीवर तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात सदर तक्रारीची दखल नाही घेतल्यास मला पंढरपूर नगर परिषदेच्या समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल याची दखल घ्यावी अन्यथा होणार्या परिणामास नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा डॉ.प्रणिताताई भिगिरथ भालके अध्यक्षा स्व.आ.भारतनाना भालके फाऊंडेशन, पंढरपूर यांच्या वतीने मा.मुख्याधिकारी पंढरपूर नगर परिषद यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
याप्रसंगी आज पंढरपूर नगरपरिषदेत विविध समस्यां बाबत प्रणिताताई भालके यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन देणार आले यावेळी किरणराज घाडगे,अरूण भाऊ कोळी, संजय बंदपट्टे, अनिल भाऊ अभंगराव,आप्पा राऊत, अनंत महाराज नाईकनवरे, नगरसेवक प्रशांत शिंदे,सुधिर धोत्रे,सुरज पावले,सागर चव्हाण इ.उपस्थित होते