नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कायमच्या उपाय योजना करण्याची मागणी.
पंढरपूर----(विनोद पोतदार)
येथील डॉ. शितल शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल समोर बुधवारी झालेल्या पावसामुळे घाणीचे साम्राज्य पसरल्याने रुग्णांच्या नातेवाईका मधून नगरपालिका प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत येथील परिसरात कायमस्वरूपाचे काँक्रिटीकरण करून तसेच स्वच्छ ठेवण्याची मागणी नातेवाईकांमधून केली जात आहे.पंढरपूर येथे झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून येत आहे. या साचलेल्या पाण्यात केरकचरा तसेच जनावरे फिरत असल्याने संसर्गजन्य आजाराचा धोका वाढू शकतो. पंढरपूर येथील डाॅ. शितल शहा यांच्या लहान मुलांच्या हॉस्पिटल समोर सध्या मोठे घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत नातेवाईकांमधून नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केला जात असून सदर परिसरात काँक्रिटीकरण करून स्वच्छता ठेवण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे.